Share

फडणवीस सरकारने महावितरणचे तब्बल 67 हजार कोटी रुपये थकवले; जयंत पाटलांचा दावा

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : राज्यात सद्या विज बिल माफीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. वाढीव विजबिलात दिवाळीमध्ये गोड बातमी दिली जाईल असं आश्वासन देणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अचानक युटर्न घेत विज बिल भरावेच लागेल असं म्हणल्यामुळे अव्वाच्या-सव्वा बिल आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबाने, व्यावसायिकांनी भरायचं तरी कसं असा उद्विग्न प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्य सरकारने वाढीव वीजबिल माफ करण्यासोबतच टाळेबंदी काळातील वीजबिलात सवलत द्यावी, या मागणीसाठी भाजप, मनसेसह इतर अन्य पक्ष देखील तीव्र आक्रमक झाले असून मनसेने राज्य सरकारला सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तर, भाजपने प्रकाशगडावर महिलांसह धडक मोर्चा काढला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष सुरु असलेला पाहायला मिळत आहे.

यावरून विरोधी पक्ष महाविकास आघाडी सरकारला वेठीस धरत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी मागील फडणवीस सरकारवरच गंभीर आरोप करत पलटवार केला आहे. ‘ मागील सरकारनं महावितरणचे 67 हजार कोटी रुपये थकवल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्रावरील वाढीव वीज बिलाचं हे संकट भाजपनेच आणल्याचा आरोप केला आहे.’

दरम्यान , शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महावितरणच्या आर्थिक तोट्याला भाजपला जबाबदार धरलं आहे. “विजेमध्ये झालेला तोटा हा भाजपच्या सरकारच्या काळातला आहे. तो त्यांनी वसूल करुन द्यावा. त्यानंतर भाजपने आरोप करावा” असं राऊतांनी सुनावलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!