Share

प्रचंड टीकेनंतर सलमानने मौन सोडलं, सुशांत बद्दल केलं ‘हे’ विधान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेते सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर चित्रपट क्षेत्रातील राजकारण, घराणेशाही, नेपोटिझम पुन्हा एकदा निशाण्यावर आले आहे. सामान्य लोकांसह सिनेअभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक यावर आता खुलेपणाने बोलताना दिसत आहे. यामुळे निर्माता करण जोहर, अभिनेता सलमान खान आणि बड्या कलाकारांना ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. सुशांतच्या निधनापासून सलमान खान याच्यावरही आरोप होत आहे. आता सहा दिवसानंतर त्याने सुशांतच्या बाबत होत असलेल्या आरोपांवर मौन सोडले आहे.

कंकणाकृती ग्रहण काळात देवीमुर्ती शुभ्र वस्ञासह सोवळ्यात

अभिनेता सलमान खान याने ट्विटरवरून सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबातील सदस्यांना या कठीण काळात साथ देण्याचे आवाहन केले आहे. माझी चाहत्यांना अशी विनंती आहे की सुशांतच्या चाहत्यांसोबत उभे राहा. त्यांनी वापरलेल्या भाषेकडे दुर्लक्ष करून त्यामागील भावना समजून घ्या. त्याच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना साथ द्या, कारण आपल्या माणसांचे जाणे अत्यंत वेदनादायक असते, असे ट्विट सलमान खान याने केले आहे.

सुशांतसारख्या गुणी अभिनेत्याच्या जाण्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्याच्या निधनाबद्दल बॉलिवूडसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. तो केवळ 34 वर्षांचा होता. त्याने अभिनयाबद्दल अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले होते. सुशांत याने हिंदी मालिकांमधून अभिनय कारकीर्द सुरू केली. त्याने सुरुवातीला ‘किस देश मे है मेरा दिल’ ही मालिका केली होती. मात्र, एकता कपूर यांच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेने त्याला घराघरात पोचवले.

त्याने ‘काय पो चे’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्याने स्वत:चे नायक म्हणून स्थान हिंदी चित्रपटसृष्टीत निर्माण केले होते. ‘शुद्ध देसी रोमांस’ या चित्रपटात तो वाणी कपूर आणि परिणिती चोप्रा यांच्यासोबत दिसला होता. भारतीय क्रिकेटसंघाचा माजी कप्तान महेंद्रसिंह धोनी याच्यावरील एम.एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात त्याने धोनीच्या भूमिका साकारली होती. या भूमिकेचे प्रेक्षकांसह समीक्षकांनी कौतुक केले होते. तसेच, आमीर खानसोबत पीके चित्रपटातील त्याची भूमिकाही नावाजली गेली होती. त्याच्या मागील काही दिवसांपूर्वी आलेला ‘छिछोरे’ हा चित्रपट खूप लोकप्रिय ठरला होता. याचबरोबर ‘केदारनाथ’ या चित्रपटात तो सारा अली खान हिच्यासोबत दिसला हो

कोरोनावर मात करायची असेल तर नियमित योगा करा – नवनीत राणा

दरम्यान, सलमान खानवर सुशांतच्या निधननानंतर विविध आरोप लावण्यात आले आहेत. ‘दबंग’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी सलमान आणि त्याच्या कुटुंबावर टीका केली. सलमानने माझी कारकीर्द संपवली असा आरोप अभिनव कश्यप यांनी केला. तसेच त्याच्या ‘बिइंग ह्युमन’ संस्थेत चॅरिटीच्या नावाखाली हवालाचा गोरखधंदा चालतो असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!