Share

कॉंग्रेसला महाराष्ट्रात ‘कर्नाटक पॅटर्न’ची भीती, आमदारांना हलवले ‘या’ राज्यात

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – राज्याच्या विधिमंडळाची मुदत आज संपत आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. अशात भाजपकडून विरोधी आमदार फोडण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर सर्वच पक्ष आप-आपले आमदार सांभाळून ठेवण्याच्या तयारीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार खबरदारीचा उपाय म्हणून कॉंग्रेसने आपले आमदार जयपूरला पाठवले आहे. यात ३०-३५ आमदारांचा समावेश आहे. राज्याच्या विविध ठिकाणावरून त्यांना जयपूरला मार्गस्थ केले आहे. त्यात नाना पटोले, विकास ठाकरे, राजू पारवे यांच्यासह इतरांचा समावेश आहे.

दरम्यान, मुंबईत आज कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बैठक बोलावली आहे. यासाठी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आज होणाऱ्या बैठकीत शिवसेनेला पाठींबा देणार की नाही या विषयी चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या बैठकीनंतर कॉंग्रेस शिवसेनेला पाठींबा देणार की विरोधी पक्षात बसणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1192681340354711554?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1192676946502488065?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1192674042370609152?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!