Share

BJP | “काँग्रेसने सावरकरांचा खुळखुळा केला, तर भाजपने स्वातंत्र्यवीरांचे खेळणे”; ठाकरे गटाचे गंभीर आरोप

Published On: 

मुंबई : भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकरांवर आरोप केले होते. ‘स्वातंत्र्ययुद्धात सावरकर हे इंग्रजांसाठी काम करीत होते. त्याचा त्यांना इंग्रजांकडून मोबदलाही मिळत होता, असे ते म्हणाले होते. राहुल गांधी यांनी स्वांतत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरुन सध्या राजकारण पेटलं आहे. यावरुन भाजपने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘उद्धव ठाकरे राहुल गांधींचा निषेध करतील काय?’ असा प्रश्न विचारला होता. त्याला आज ठाकरे गटाने प्रत्युत्तर दिले आहे. ‘सामना’ मधून कॉंग्रेस आणि भाजपवर टीका केली आहे

सावरकरांच्या विचारांचे वारसदार असल्याचे सांगून जे सत्तेवर आले त्यांनी तरी या दीपस्तंभाचा काय सन्मान केला? फक्त राहुल गांधींना दोष देऊन काय फायदा? घरभेद्यांनीच सावरकरांचा सगळ्यात जास्त अपमान केला. “काँग्रेसने वीर सावरकरांचा खुळखुळा केला आहे, तर भारतीय जनता पक्षाने स्वातंत्र्यवीरांचे खेळणे केले आहे, असा आरोप आज शिवसेनेने अग्रलेखात केला आहे. काँग्रेस सावरकरांचा अपमान करीत असते व त्या अपमानाबद्दल भाजपवाले जाब वगैरे विचारत असतात. मात्र, हाती पूर्ण सत्ता असूनही भाजपने या दीपस्तंभाचा काय सन्मान केला? स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न का दिले नाही?, असा सवाल अग्रलेखात शिवसेनेने केला आहे.

सावरकर हा भाजपच्या दृष्टीने तोंडी लावायचा आणि चघळायचा विषय झाला आहे. सामनाने म्हटले आहे की, “राहुल गांधी जेव्हा काही विधाने करतात तेव्हा भाजपच्या लोकांना सावरकरांची आठवण येते. बाकीच्या काळात सावरकर कोण आहेत आणि त्यांची कल्पना काय आहे, सर्व काही गुंडाळून ठेवले आहे. काँग्रेस आणि भाजप दोघांनीही सावरकरांचा अभ्यास करण्याची गरज आहे.”

काँग्रेस नेत्यांना इतिहासाचे ज्ञान नसून नवीन पिढी इतिहासापासून पूर्णपणे अज्ञान असल्याचे शिवसेनेने आता सामना या मुखपत्रातून म्हटले आहे. काँग्रेसने सावरकरांना ‘जिंगल’ बनवल्याचा आरोपही शिवसेनेने काँग्रेसवर केला आहे. सामानातून केलेल्या या आरोपांना भाजप आणि काँग्रेसकडून काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!