Share

काँग्रेसने शेतकऱ्याला पोपट बनवुन पिंजऱ्यात ठेवले, पण मोदींनी शेतकऱ्यांना यातून मुक्त केले !

Published On: 

बारामती : शेतकऱ्याला पिंजऱ्यात पोपट बनवुन काँग्रेसने ठेवले होते.त्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडण्याचे काम मोदी सरकार करत आहेत. मात्र, शेतकऱ्याच्या जीवावर जगणारी बांडगुळ परत शेतकऱ्याला बंद करण्यासाठी धडपडत आहेत. यामध्ये काँग्रेस पाठोपाठ कम्युनिस्टांचा देखील समावेश आहे, अशी टीका शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेला माझे चॅलेंज़ आहे. २००६ मध्ये करार शेतीचा कायदा काँग्रेसनेच मंजूर केला. करार शेतीचा खेळ महाराष्ट्राला बारामतीने दाखवला. बारामतीत कृषि प्रदर्शनात वेगवेगळ्या देशातुन आणल्याचे सांगतात. शेतीचा करार उगम बारामतीतुन होतो, या कायद्याची अंमलबजावणी बारामतीतुन होते, असा आरोप खोत यांनी केला.

बारामती येथे खोत हे न्यायालयीन कामकाजासाठी मंगळवारी आले होते. न्यायालयीन कामकाज पुर्ण झाल्यानंतर खोत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खोत पुढे म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकामध्ये मार्केट कमिटीच्या बाहेर शेतीमाल बाहेर विकता आला पाहिजे, असे नमुद केले आहे. बारामतीचा माझा भाजीपाला घेवुन मी मुंबई मार्केट कमिटीला गेलो होतो. तेव्हा तेथे आडत, हमाली से एवढे कट झाल्यावर मला सुध्दा येथे लुट असल्याचे वाटायला लागत,असे पवार यांनी पुस्तकात लिहिले आहे.

ही गोष्ट खरी असल्याचे मला वाटले होते. मात्र, आता ते विरोधात बोलत आहेत. त्यामुळे याचा अर्थ सरळ आहे. साहेब आपला भाजीपाला घेवुन गेले नव्हते. तेवढे लबाड बोलले आहेत. ते लिहिलेले खरे असल्यास ते आत्मचरित्र हे कृषिचरित्र म्हणुन लागू करावे,अशी थेट मागणी खोत यांनी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!