मुंबई – डोंबिवलीच्या सामूहिक बलात्काराच्या घटनेतील उर्वरीत आरोपींना अटक करण्यात यावी तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी प्रसिद्ध पत्रकात केली आहे.
उमाताई खापरे यांनी पत्रकात म्हटले आहे कि, राज्यात सध्या दुर्दैवी घटना घडताना दिसत आहेत, आजचीच घटना, डोंबिवलीमध्ये 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली. प्रियकराने जानेवारी महिन्यात पीडित मुलीवर बलात्कार करत व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर 29 जणांनी बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या पीडितेला उपचारासाठी ठाणे येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
खापरे यांनी पत्रकात म्हटले आहे कि, सध्या परिस्थितीमध्ये पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी ही खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसं पाहिलं तर रोज राज्यात दोन तीन ठिकाणी बलात्कार होत आहेत. पोलिस यंत्रणा का काहीच हालचाल करताना दिसत नाही? कुठेतरी हि प्रकरणे दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यामुळे ह्या घटना वाढत चालल्या आहे. जोपर्यंत या घटनेतील नराधमांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत या घटनांना आळा बसणार नाही. या प्रकरणातील आरोपींना सुरक्षा देण्याचे काम पोलीस यंत्रणेकडून केले जात आहे. त्यामुळे या घटनांमध्ये वाढ होत आहे.
राज्य सरकारकडे आम्ही वारंवार शक्ती कायद्याची मागणी करत आहोत, मात्र हे राज्य सरकार या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिलं होतं मात्र मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे बोट दाखवलं. आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून अशी परिस्थिती या राज्य सरकारची झाली आहे. शक्ती कायदा जर आमलात आणला तर निश्चितच या घटनांना आळा बसेल, असे देखील खापरे यांनी पत्रकात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाविकास आघाडीच्या एकीवर काँग्रेसला विश्वास नाही का?’, ‘त्या’ भेटीवर सेना-राष्ट्रवादीत नाराजीची चर्चा
- ‘मोदी सरकारचे ओबीसींवरचं प्रेम बेगडी’, प्रा. हरी नरकेंचा आरोप
- ‘तुला काय फरक पडतोयं’; सामन्यापूर्वी केकेआरचा रोहितला न खेळण्याचा सल्ला
- काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद रणपिसे यांचे पुण्यात निधन
- जॅकी उर्फ ‘जग्गुदादा’ची टपोरी भाषा ऐकायला मिळणार ; ‘बिग बी’सोबत चाहत्यांमध्ये उत्सुकता


