बेळगाव: बेळगावातील मनगुत्ती या गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा ७ ऑगस्टच्या रात्री काढण्यात आला. यानंतर, तिथल्या गावातील मराठी भाषिकांनी या गोष्टीचा विरोध करून आवाज उठवल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून शिवभक्तांनी यावर संताप व्यक्त केला होता. तर, यावरून राज्यातील अनेक नेत्यांनी कर्नाटकात भाजपाचे सरकार असून छत्रपती शिवरायांचा फक्त मतांसाठी वापर केला जातो असा आरोप राजकीय नेत्यांनी लावण्यास सुरुवात केली होती.
यावर आता, एक महत्वाची बाब समोर आली आहे. त्या अश्वारूढ पुतळाच्या अनावरणावरून काहीसा गोंधळ झाल्याने तो पुतळा काँग्रेसी आमदार सतीश जारकीहोळी यांच्या सांगण्यावरून हटवण्यात आल्याचा आरोप भाजपाचे नेते निलेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे, आता यावर राज्यातील शिवसेना काय भूमिका घेणार? असा सवाल विचारत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी भाजपावर केल्या आरोपांना निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
‘छ. शिवाजी महाराजांचा वारंवार होणारा अवमान खपवून घेणार नाही;भाजपने आपल्या वर्तनात बदल करावा’
निलेश राणे यांनी, ” डांबरचोर उदय सामंत कर्नाटकात छ. शिवरायांचा पुतळा काँग्रेसचे नेते सतीश जारकीहोळी यांनी हटवला आहे. आणि त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून हा डांबरचोर सत्तेत आहे. हिंमत असेल तर मंत्रीपदाचा राजीनामा दे. जय शिवराय! ” असे ट्विट करत सामंत यांच्यासह शिवसेनेवर जळजळीत टीका केली आहे.
डांबरचोर उदय सामंत कर्नाटकात छ. शिवरायांचा पुतळा काँग्रेसचे नेते सतीश जारकीहोळी यांनी हटवला आहे. आणि त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून हा डांबरचोर सत्तेत आहे. हिंमत असेल तर मंत्रीपदाचा राजीनामा दे. जय शिवराय!!! pic.twitter.com/Lua1Wcwt8t
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 9, 2020
…अन्यथा कर्नाटकात येऊन मस्ती जिरवू : राजेश क्षीरसागर
त्यामुळे, एकीकडे महाराष्ट्रात काँग्रेससोबत असलेल्या महाविकास आघाडीची सत्ता असणारी शिवसेना, राज्यभरात रस्त्यावर उतरून आक्रमक भूमिका घेणार होती, तर, आता या काँग्रेस आमदाराविरोधात काय भूमिका घेणार हे देखील महत्वाचे आहे. कालपासून कर्नाटक राज्यात सरकार असलेल्या भाजपावर टीका करण्यात येत होती, त्यानंतर आता या प्रकरणाचा उलगडा होत, तेथील स्थानिक आमदार व काँग्रेस नेत्याचे नाव समोर येत असल्याने राजकीय आरोप प्रत्यारोप तर वेगळे वळण घेईलच, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा त्याठिकाणी सन्मानाने स्थापन झाला पाहिजे अशी भावना शिवभक्त व्यक्त करत आहेत.
कॅप्टन दीपक साठे यांच्या कुटुंबियांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचेकडून सांत्वन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

