जालना- कर्नाटक सरकारच्या आदेशावरून बेळगाव जिल्ह्यात मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आल्याचा संतापजनक प्रकार शनिवारी घडला आहे. शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला असून छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार होणारा अवमान खपवून घेतला जाणार नाही. भाजप नेत्यांनी आणि पक्षाने आपल्या वर्तनात बदल करावा अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे.
कर्नाटक राज्यात सध्या भाजपचे सरकार आहे. बेळगाव जिल्ह्यातील एका गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटविल्यामुळे कर्नाटकचा सरकारचा सीमाभागातील मराठी माणसांप्रती असलेला द्वेष पुन्हा समोर आला आहे. बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात तेथील नागरिकांनी हा पुतळा बसवला होता. कर्नाटक सरकारच्या आदेशावरून तो हटवण्यात आला आहे. या घटनेमुळे राज्यातील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. शिवप्रेमीं संघटनानी या घटनेच्या निषेधार्थ बेळगावात जाऊन आंदोलन करन्याचा निर्धार केला आहे.
दरम्यान शिवसेनेचे माजी राज्यमंत्री खोतकर यांनी या घटनेचा निषेध केला असून या घटनेमुळे राज्यातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे कायदा हातात घ्यायलाही शिवप्रेमी मागे पुढे पाहणार नाही. महाराष्ट्र्सह देशाचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविन्यामागे बोलावते धनी कोण आहेत हे सर्वांना माहीत आहे.
कर्नाटकात भाजप सरकार आहे. त्यामुळे निश्चितच त्याच्या इशाऱ्यावर हे सुरू असल्याचे ते म्हणाले. भाजप सरकारच डोकं ठिकण्यावर आहे का ? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली असून भाजप नेते व पक्षांनी वर्तन बदलावं अन्यथा गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील. असा थेट इशारा त्यांनी भाजपला दिला आहे.
महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –
देश भावूक होतो अन हे फाईल्स गायब करतात, चीनच्या मुद्द्यावरून राहुल गांधींचा परत मोदींवर निशाणा
भाजपच्या मनात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत द्वेष का आहे ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

