🕒 1 min read
मुंबई : केंद्र सरकारनं थोर स्वातंत्र्यसेनानी आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती यावर्षीपासून ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 ला झाला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाांचा शुभारंभ 23 जानेवारीला कोलकाता येथील ऐतिहासिक ‘विक्टोरिया मेमोरियल हॉल’ येथून करतील. कोरोना महामारी सुरु झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदा कोलकात्याच्या दौऱ्यावर असतील. नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पुतणी चित्रा घोष यांच्या निधनावर आदरांजली अर्पण केली होती. नरेंद्र मोदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं शौर्य सर्वांना माहिती आहे, असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले होते.
यावर आता कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. ‘भाजपचा नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आयोजित करण्याचा प्रकार म्हणजे हिंदुत्ववादी ढोंग आहे. नेताजींचे धर्मनिरपेक्ष विचार, क्रांतिकारी कृती यांच्याविरुद्ध वागणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप कधीही त्यांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करू शकत नाही’! असा घणाघात नितीन राऊत यांनी केला आहे.
भाजपचा #नेताजी_सुभाष_चन्द्र_बोस यांची जयंती आयोजित करण्याचा प्रकार म्हणजे हिंदुत्ववादी ढोंग आहे. नेताजींचे धर्मनिरपेक्ष विचार, क्रांतिकारी कृती यांच्याविरुद्ध वागणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप कधीही त्यांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करू शकत नाही!#NetajiSubhasChandraBose
— Dr. Nitin Raut ???????? (@NitinRaut_INC) January 22, 2021
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाचे संकट अद्याप संपले नसल्याने शिवजयंती उत्सवही सुरक्षित वातावरणात साजरा करा – अजित पवार
- कोरोनालसीबाबत सत्य न तपासता आरोप करणे पडले महागात; हरभजनला मागावी लागली माफी
- शिवनेरी गडावर करण्यात येणारी विकासकामे दर्जेदार होतील याची दक्षता घ्या – अजित पवार
- आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जयंती, राज आणि उद्धव ठाकरे येणार एकाच मंचावर !
- मोठी बातमी : राज्यातील बर्ड फ्लू नुकसानग्रस्तांना भरपाई देणार, पशुसंवर्धनमंत्र्यांची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
