🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र कॉंग्रेस पक्षाच्या गोटात अजूनही शांतता असल्याचे दिसत आहे. यावरून एका कॉंग्रेस नेत्यानेच कॉंग्रेस पक्षाला घरचा आहेर दिला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे केवळ संगमनेरचेचं प्रदेशाध्यक्ष असल्याची टीका केली आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षात कमालीची विसंगती असल्याच दिसत आहे.
काँग्रेसचे विदर्भातील नेते आशिष देशमुख यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. आशिष देशमुख म्हणाले की, सध्या पक्षात बाळासाहेब थोरात हे केवळ संगमनेरचेचं प्रदेशाध्यक्ष असल्याची चर्चा आहे. तसेच पक्षाचे 5 कार्याध्यक्षही निष्क्रिय आहेत. तसेच पक्षात ही त्यांच्या कामाविषयी नाराजी आहे.
यावेळी आशिष देशमुख यांनी भाजपवर ही निशाणा साधला. भाजपाची विचारसरणी ही संघाची आहे. त्यावर गोळवलकर, हेडगेवार यांच्या विचारांचा पगडा आहे. हे विचार देशाच्या किती उपयोगी आहेत, हा प्रश्न आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेसमध्ये सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पक्ष सोडण्याचा विचार करताय का, असे विचारले असता पक्ष सोडण्याचा आपला कुठलाही विचार नाही. मी काँग्रेससोबतच राहीन, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1176031358855991296?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1176029900571955200?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1176028552333934592?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
