मुंबई : विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त आठ सदस्यांची मुदत शनिवारी (ता.६) संपत आहे; तर अन्य दोन सदस्यांची मुदत १५ जूनला संपुष्टात येणार आहे. त्यामुळे विधान परिषदेवरील राज्यपाल नामनियुक्तीसाठी आघाडीत मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या कोकणाला विशेष आर्थिक पॅकेज द्या – भाजपा
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल नार्वेकर आणि रामराव वडकुते यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तेव्हापासून राज्यपाल नामनियुक्त दोन जागा रिक्त आहेत.६ जूनला निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये काँग्रेसच्या हुस्नबानू खलिपे, जनार्दन चांदूरकर, आनंदराव पाटील आणि रामहरी रूपनवर यांचा समावेश आहे.
या निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकाश गजभिये, विद्या चव्हाण, ख्वाजा बेग आणि जगन्नाथ शिंदे यांचा देखील समावेश आहे. तर १५ जूनला निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये काँग्रेसचे अनंत गाडगीळ आणि रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे यांचा समावेश आहे.
राज्यसभा आणि विधान परिषद या वरिष्ठ सभागृहांमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अनुभवाचा देश किंवा राज्यांना फायदा व्हावा म्हणून त्यांची नियुक्ती करण्याची घटनेतच तरतूद करण्यात आली. यानुसार राष्ट्रपती राज्यसभेवर तर राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करतात. विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांची मुदत येत्या शनिवारी संपुष्टात येत असल्याने नव्या १२ आमदारांची नियुक्ती लवकरच होणार असल्याने राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे.
वाह सीएम ! आंध्रप्रदेशात 2 लाख 62 हजार वाहन चालकांना मिळणार प्रत्येकी 10 हजार
अर्थात,आमदारकीची माळ गळ्यात पडून घेण्याकरिता अनेक दिग्गज लॉबिंग करताना पाहायला मिळत आहेत. असे असले तरीही राज्यपाल आणि महाविकास आघाडी नेत्यांचे संबंध लक्षात घेता, मंत्रिमंडळाने शिफारस केलेल्या नावांवर राज्यपाल शिक्कामोर्तब करतील का याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत.
महाराष्ट्र विधान परिषदेत १२ सदस्य नियुक्त करण्याचे राज्यपालांना अधिकार आहेत. मंत्रिमंडळाकडून शिफारस करण्यात आलेली नावे राज्यपालांकडून स्वीकारली जातात.राज्यपाल सरकारने सुचविलेल्या नावांना मंजुरी देताना नियमांवर बोट ठेवत आघाडीच्या अडचणी वाढवतील अशी देखील शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे तीन प्रमुख पक्ष असून राज्यपाल नामनियुक्त १२पैकी प्रत्येकी चार जागा वाट्याला याव्यात असे एक सर्वसाधारण सूत्र आहे. मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने एकच जागा लढवल्याने राज्यपाल नामनियुक्तीमध्ये आपल्याला एक अतिरिक्त जागा मिळावी, अशी पक्षाची मागणी असल्याचे आमच्या सूत्रांनी कळवले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

