टीम महाराष्ट्र देशा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. कॉंग्रेसने जनतेच्या कल्याणासाठी काहीच केले नाही अशी टीका त्यांनी मध्यप्रदेशातील मुलताई येथील सभेत बोलताना केली.
कॉंग्रेसमुळेच आपल्या देशात दारिद्र्य आहे. आपला देश संपन्न आहे परंतु देशातील लोक गरीब आहेत. याचे कारण कॉंग्रेसच्या काळात शेती आणि खेडे गावांच्या विकासासाठी कोणतीही योजना गंभीरपणे राबवली नाही. यामुळेच गहू स्वस्त मिळतो तर बिस्कीट महाग मिळते तसेच फळे स्वस्त मिळतात परंतु त्याचा रस महाग मिळतो याला कॉंग्रेस जबाबदार आहे अशी टीका त्यांनी केली.
पुढे बोलताना गडकरी यांनी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांना देशातील गरिबी दूर करण्यात अपयश आले असल्याचं वक्तव्य केले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

