मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीला उडवून देण्याच्या धमकीनंतर काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील धमकी आल्याची माहिती समोर येत असून याबाबत गृहमंत्रालयाच्या सुत्रांनी माहिती दिली आहे. हे फोन बाहेरच्या देशातून होते अस त्यांच म्हणणं आहे.
या धक्कादायक घडामोडीनंतर आता भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे. त्यांनी ” मुख्यमंत्र्यांना धमकी(शिवसेना), शरद पवार यांना धमकी (राष्ट्रवादी), अनिल देशमुख यांना धमकी (राष्ट्रवादी)..काँग्रेस ची परिस्थिती किती वाईट आहे;त्यांना बाकीच्या विषयात तर नाहीच पण या विषयातही भाव दिला जात नाही,” अशी उपरोधिक टीका केली आहे.
मुख्यमंत्र्यांना धमकी( शिवसेना)
शरदजी पवार यांना धमकी (राष्ट्रवादी)
अनिलजी देशमुख यांना धमकी (राष्ट्रवादी)
काँग्रेस ची परिस्थिती किती वाईट आहे;त्यांना बाकीच्या विषयात तर नाहीच पण या विषयातही भाव दिला जात नाही????@Dev_Fadnavis @ChDadaPatil@poonam_mahajan @BJYM @BJP4Maharashtra— Vikrant Balasaheb Patil (@ivikrantpatil) September 7, 2020
काय आहे हे ‘धमकी’ प्रकरण?
कंगना रणौतवर गृहमंत्र्यांनी टिप्पणी केल्यानंतर हे असे फोन येत आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरक्षा यंत्रणा करत आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीती नुसार हे फोन कॉल दुबईहून आले होते. फोन करणारी व्यक्ती दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देत होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान बाँम्बने उडवून देण्याची धमकी देणारी व्यक्ती कोण आहे? दुबईहून फोन कॉल मातोश्रीच्या लँडलाईनवर कुणी केला याचा तपास आता सर्व सुरक्षा यंत्रणा करत आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
मी ठणठणीत, तुम्ही पण काळजी घ्या- आ.मोनिका राजळे
अर्णव गोस्वामीनंतर आता कंगणावर आणला कॉंग्रेसने हक्कभंग प्रस्ताव, महाराष्ट्रात राजकीय गदारोळ
गेमिंग कम्युनिटीसाठी खुशखबर , PUBG करणार कमबॅक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

