टीम महाराष्ट्र देशा – आज जाहीर होत असलेल्या पाच राज्यांच्या निकालात काँग्रेसने बहुमताच्या दिशेने आगेकूच केली आहे. राजस्थान, छत्तीसगड राज्यात कॉंग्रेस बहुमताच्या दिशेने जाताना दिसत आहे. तर मध्यप्रदेश मध्ये अजून चित्र अस्पष्ठ आहे.
विधानसभेच्या ९० जागा असलेल्या छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसने ५९ जागांवर आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी भाजप २४ जागांवरती आघाडीवर आहे. छत्तीसगडमध्ये रमण सिंह मागचे १५ वर्ष मुख्यमंत्री आहेत.ही निवडणूक जिंकली असता रमणसिंह सलग चौथ्या वेळी मुख्यमंत्री झाले असते, परंतु सध्याची परिस्थिती पाहता भाजपला सत्ता राखणे अवघड आहे.
लोकसभेची सेमीफायनल- मध्यप्रदेशात कॉंग्रेस नेते कमलनाथ यांच्या घरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

