Share

दिल्ली : आंदोलकांचा पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

Published On: 

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात ट्रॅक्टर मार्च काढला आहे. याला पोलिसांनी परवानगी दिलेली असली तरीही काही ठिकाणी आंदोलकांकडून पोलिसांवर हल्ला करण्याचा देखील प्रकार घडला आहे.

अनेक ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड लावून रस्ते अडविले आहेत. काही ठिकाणी पोलीस आणि शेतकऱ्यांचे जत्थे आमने-सामने आले आहेत. तर दुसऱ्या बाजूला अक्षरधामच्या आधी एनएच 24 वर शेतकऱ्यांनी पोलिसांकडून लावण्यात आलेले बॅरिकेड तोडले आहेत. यामुळे पोलिसांनी तिथे लाठीचार्ज केला आहे. पोलिसांनी अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज करत या शेतकऱ्यांना माघारी जाण्यास भाग पाडले.

दरम्यान,दिल्लीमधील आयटीओ परिसरात पोलीस आणि शेतकऱ्यांमधील संघर्ष पेटला आहे. एका आंदोलकाने वेगाने ट्रॅक्टर आणत रस्त्यावर उभ्या पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. आंदोलक नियंत्रणाबाहेर गेल्याचं चित्र असून तलवार आणि काठ्या घेऊन पोलिसांचा पाठलाग करतानाचं चित्रही पहायला मिळालं.

या हिंसाचारावर शेतकरी नेते योगेंद्र यादव यांनी प्रतिक्रिया देतानाच निषेध देखील नोंदवला आहे. ‘हिंसा करणारे आमचे आंदोलक नाहीत. आजच्या दिवशी जे घडलं ते घृणास्पद आणि लाजिरवाणं आहे. हिंसा करणं अयोग्य आहे, ‘ असं ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!