उत्तर प्रदेश : आगामी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची जय्यत तयारी सुरु असून भाजपने देखील यंदाच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे दसऱ्यानंतर राजकीय पक्षांची राज्यात चांगलीच चढाओढ बघायला मिळणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आगामी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे सभा घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमिवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी देखील छाननी समितीची घोषणा केली आहे. या समितीचे अध्यक्ष राजस्थानचे जितेंद्र सिंह असून समितीमध्ये हरियाणाचे दीपेंद्र हुडा आणि महाराष्ट्रातील मंत्री वर्षा गायकवाड यांचा देखील समावेश आहे. तसेच काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश निवडणूक प्रभारी प्रियांका गांधी, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय लल्लू आणि आराधना मिश्रा यांच्यासह सर्व सचिव उमेदवारांच्या निवडीसाठी स्क्रीनिंग करणार आहेत.
Congress constitutes Screening Committee for forthcoming UP polls – Jitendra Singh to be the chairman, Deepender S Hooda & Varsha Gaikwad members.
Gen Secy in-charge Priyanka Gandhi Vadra, party's UP chief Ajay Lallu, CLP leader Aradhana Misra Mona to be the ex-officio members. pic.twitter.com/3Ihff6PnLN
— ANI (@ANI) September 17, 2021
दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रियांका गांधी यांच्यावरील पहिला प्रोमो देखील प्रसिद्ध केला आहे. यामध्ये प्रियंका गांधी यांचं वर्णन ‘उत्तर प्रदेशची आशा’ असे करण्यात आले आहे. तसेच काँग्रेसने अजून कोणत्याही मोठ्या पक्षासोबत विधानसभा निवडणुकीत युती करण्याचे संकेत दिलेले नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या
- ज्यांना कुणाला आमच्यासोबत यायचंय त्यांनी खुशाल यावे आणि भावी व्हावे-संजय राऊत
- भाजपसोबत युतीबाबत मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान, तर मोदींना शुभेच्छा देताना म्हणाले…
- ‘उद्धवजी माझ्या कानात म्हणाले मुंबईला या, आपण बसू’
- पुणे : विसर्जनाच्या दिवशी शहर आणि परिसरातील सर्व दुकाने बंद राहणार
- भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच; आता कट्टर विरोधक नारायण राणे म्हणाले…


