Share

पुणे : विसर्जनाच्या दिवशी शहर आणि परिसरातील सर्व दुकाने बंद राहणार

Published On: 

पुणे : राज्यावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट येण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाच्या सावटामुळे सणांवर देखील विविध प्रकारची बंधने आणली जात आहेत. यातच आता वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यनगरीतील गणेशोत्सवावर करोनाचे सावट असून पोलिसांकडून उत्सवासाठी नियमावली लागू करण्यात आली आहे.

घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांनी खरेदीसाठी गर्दी करू नये, रस्ते, पदपथांवर मूर्ती विक्री स्टॉल लावू नयेत, तसेच प्रतिष्ठापना आणि विसर्जन सोहळ्यासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांना यंदाही परवानगी देण्यात येणार नाही, आदीचा समावेश असलेली नियमावली पोलिसांनी तयार केली आहे. तर अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती विसर्जनाच्या दिवशी पुणे, पिंपरी चिंचवड आणि कॅन्टोनमेंट परिसरातली सर्वच्या सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याविषयीची घोषणा केली आहे. जिल्ह्यातले सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांनी मिळून हा निर्णय घेतला असल्याचंही पवार यांनी सांगितलं. गणेशोत्सवाचा प्रारंभ १० सप्टेंबर रोजी झाला आहे. प्रतिष्ठापना सोहळा तसेच विसर्जन सोहळ्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकींना यंदा परवानगी नाही, असे सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी नियमावलीत नमूद केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!