Share

मोदी सरकार गाफिल राहिले आणि त्याची किंमत देश चुकवीत आहे – कॉंग्रेस

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे आहे. काही महिन्यांपूर्वी चीनच्या वुहान प्रांतातील एका मांस बाजारातून सुरु झालेली ही विषाणू प्रसाराची साखळी आता संपूर्ण जगात पोहचली आहे. चीनने माहिती दडूवून ठेवल्याने जगाला या महामारीचा सामना करावा लागत असल्याचे आरोपही करण्यात येत आहे.

या विषाणूवर अदयाप कुठलीही लस उपलब्ध नसल्याने कमीत कमी गर्दी करणे आणि सोशल डीस्टनसिंग हाच यावर उपाय असल्याने सर्व जगात आता याच उपायाची अंमलबजावणी केली जात आहे. भारतानेही आता देशात लॉक डाऊन तसेच अंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत वाहतूक व्यवस्था बंद केली आहे.

आता कॉंग्रेसकडून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर गाफील राहिल्याची टीका केली आहे. महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटरवर म्हटलंय,

आंतरराष्ट्रीय वाहतूकीवर १ मार्चपासूनच निर्बंध आणून कसोशीने उपाययोजना केली असती तर देश #coronavirus च्या तसेच आर्थिक संकटात सापडला नसता. पण मोदी सरकार गाफिल राहिले आणि त्याची किंमत देश चुकवीत आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!