औरंगाबाद : शहरात कोरोनाचे रूग्ण वाढतांना दिसत आहेत. एकाच घरात तीन ते चार रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे महापालिकेने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. महानगरपालिकेने शहरातील कोचिंग क्लासेस, मंगल कार्यालये तपासणीसाठी पाच पथके तैनात केली असून मास्क, सोशल डिस्टंसिंग, सॅनेटायझरचा वापर, संख्यांची मर्यादा याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आल्यास कठोर कारवाई करावी, असे आदेश पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी (दि. १७) दिले. तर अंत्यविधीसाठी २० जणांना व मंगल कार्यांना ५० ची परवानगी देण्यात आली आहे.
शहरात अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी व दफनभूमीमध्ये होणारी गर्दी चिंता व्यक्त करणारी आहे. अंत्यसंस्कार, दफन करण्यासाठी २० व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची परवानगी आहे. मात्र अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी, दफनभूमीमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. नागरिक मास्क न लावता व सामाजिक अंतर न पाळता त्या ठिकाणी येत आहेत. त्यामुळे स्मशानभूमी व दफनभूमीच्या प्रवेशद्वारावरच मास्क नाही तर प्रवेश नाही, असे फलक लावण्याची सूचना स्मशानजोगी व दफनभूमीच्या कर्मचार्यांना करण्यात आली आहे. अंत्यंसस्काराला २० पेक्षा अधिक व्यक्तींनी उपस्थित राहू नये, अशीही सूचना केली आहे.
शहरातील मंगल कार्यालयात विवाह सोहळयांसह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची नागरिक मित्र पथकाकडून तपासणी केली जाईल. हे पथक मंगल कार्यालयात जावून ५० पेक्षा अधिक संख्या, मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंग, सॅनेटायझरचा वापर केला जात नसल्याचे आढळून आल्यास दहा हजार रुपयाचा दंड केला जाईल. दुसर्या तपासणीत नियम पाळले जात नसल्याचे दिसून आल्यास २० हजार रुपये दंड व १५ दिवसासाठी मंगल कार्यालय सील केले जाईल.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसच्या रॅलीत कोरोना नियमांचा बट्ट्याबोळ ! शिवजयंतीवर निर्बंध पण राजकीय पक्षांना लगाम घालणार कोण ?
- शेतकरी आंदोलन पुन्हा उसळणार ! ४० लाख ट्रॅक्टर दिल्लीत आणण्याचा राकेश टिकैत यांचा इशारा
- फर्दापूरतांडा येथील कल्पवृक्ष तिर्थक्षेत्रावर बसस्थानकाचे काम सुरु
- ‘येथे कोरोना रुग्ण आहे’; घराबाहेर लागणार फलक
- शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी घालता मग…वशाटोत्सव आणि साहित्य सम्मेलनही रद्द करा – संभाजी ब्रिगेड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

