Share

गुगलने हटवले ‘११’ धोकादायक ऍप, युझर्सलाही तातडीने हटवण्याचा सल्ला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारत-चीन तणावांनातर भारत सरकारने असुरक्षित असलेले तब्बल ‘५९’ चिनी ऍप्सवर बंदी आणली होती. ज्यात टिकटॉक, कॅमस्कॅनर, शेअरइट, हागो, यासारख्या कोट्यवधी युजर्स असलेल्या ऍप्सचा समावेश होता. आता यावर गुगलने देखील कडक पाऊल उचलले असून स्मार्टफोनच्या माध्यमातून हॅकर्सद्वारे लोकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी हे ऍप्स हटवले आहेत. तसेच युजर्सला देखील हे ऍप्स तातडीने हटवण्याचा सल्ला दिला आहे.

गुगलने 11 अ‍ॅप प्ले स्टोअरमधून हटवले आहेत. हे अँड्रॉईड ऍप्स थेट युझर्सच्या बँक खाते हॅक करु शकतात. ज्या माध्यमातून कधी-कधी क्रेडिट-डेबिट कार्डमधून पैसेही कट होऊ शकतात आणि युझर्सला समजतही नाही. तसेच यामधून युझर्सच्या परवानगीशिवाय त्यांच्या फोनमधून प्रीमिअम सर्व्हिससाठी सब्सक्राईब केले जाते.

पत्रास करण की… फडणवीसांचे पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र !

या ११ ऍपमध्ये CHERRY MESSAGE (दोन वेगवेगळे ऍप), RELAXATION MESSAGE, MEMORY GAME, LOVING MESSAGE, FRIEND SMS, CONTACT MESSAGE, COMPRESS IMAGE, APP LOCKER, RECOVER FILE आणि REMIND ALARM- ALARM & STOPWATCH APP या ११ ऍप्स चा समावेश आहे.

‘कोरोनातून महाराष्ट्र मुक्त व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, याच माझ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा’

2017 पासून गुगलचे या अ‍ॅपवर लक्ष होते. हे सर्व अ‍ॅप जोकर मालवेअरपासून इन्फेक्टेड आहेत. या अ‍ॅपला 2017 ला गुगलने ट्रॅक केले होते. हे सर्व अ‍ॅप अनेक वर्षांपासून गुगलच्या प्ले स्टोअर प्रोटेक्शनच्या नजरेतून स्वत: चा बचाव करत आहेत. युझर्सने किमान पाच लाख वेळा हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहेत. आता युझर्सलाही हे अ‍ॅप डिलिट करण्यास सांगण्यात आले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला गुगलने 1700 अ‍ॅपला गुगल प्ले स्टोअरमधून हटवले होते. हे सर्व अ‍ॅप जोकर मालवेअरला इन्फेक्टेड होते.

‘जोपर्यंत आमदारांची डोकी नीट मोजली जात नाहीत, तोपर्यंत भाजप उघडपणे पुढे येऊन काही करणार नाही’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!