Share

‘अभिनंदन टोपे साहेब, फॉर्म भरताना नागपूर, परंतु परीक्षेला केंद्र सकाळी ठाणे आणि दुपारी वाशिम’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागाच्या भरतीचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला असून एकदा ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्यानंतरीही आता पुन्हा परीक्षा घेताना विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. धक्कादायक बाबा म्हणजे अनेक परीक्षार्थींना अर्ज करताना जे केंद्र मागितले ते मिळाललेच नाही. उलट एकाच दिवशी होणाऱ्या दोन पेपरसाठी सकाळीवेगळ्या जिल्ह्यात आणि दुपारी वेगळ्या जिल्ह्यात केंद्र दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदापरीक्षार्थींकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

यासंदर्भात चंद्रपूरमधील परीक्षार्थी नितेश दडमल याने समाज माध्यमांशी संवाद साधतांना म्हंटले आहे की,’मी चंद्रपुर जिल्हातील रहिवासी आहे. माझी आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे मी ठाण्याला एवढ्या लांब जाऊन परीक्षा देऊ शकत नाही. २५ सप्टेंबर २०२१ रोजीची पुढे गेलेल्या परीक्षेला मला दोन्ही पदांकरीता नागपूर केंद्रच मिळाले होते. शासनास माझी हीच नम्र विनंती आहे की यावेळी सुद्धा परीक्षा फार्म भरताना मी जे नागपूर परीक्षा केंद्र निवडलं होतं, तिथेच परीक्षा केंद्र उपलब्ध करून द्यावं. तसेच मी परीक्षेपासून वंचित राहिल्यास याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल.’

दरम्यान, यासंदर्भात नितेश याने ट्विटरवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर टीकास्त्रांचा वर्षाव करत म्हंटले आहे की,’आरोग्य विभागाच्या भरतीत पुन्हा एकदा नियोजनाचा अभाव जाणवल्याबद्दल टोपे साहेब अभिनंदन. अर्ज भरताना तर मी नागपूर परीक्षा केंद्र निवडलं होतं. असं असतांना आता परीक्षेला सकाळच्या सत्रात ठाणे आणि दुपारच्या सत्रात वाशिम परीक्षा केंद्र दिलंय. आरोग्य भरती करणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!