🕒 1 min read
मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. नितीश कुमार पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव विजय मिळवणार हे आज स्पष्ट होईल. बिहार विधानसभा निवडणुकीत सुरुवातीच्या कलांनुसार भाजप-जेडीयू यांच्या युतीने आघाडी घेतली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांचा करिष्मा चालणार असून महागठबंधनला स्पष्ट बहुमत मिळेल असा दावा सर्वच माध्यमांनी एक्झिट पोलद्वारे केला होता. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन तासांमधील चित्र जवळपास तसेच होते. मात्र १० वाजेनंतर आता संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत एनडीए अर्थात नितीश कुमार यांनी आघाडी कायम ठेवली आहे.
बिहारच्या विधानसभा निवडणुकीत महागठबंधनने नितीशकुमार आणि एनडीएवर प्रचंड टीका केली मात्र त्यांना बिहार च्या जनतेने नाकारले असून एनडीए ला स्पष्ट बहुमत दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितीश कुमार, भाजपचे सुशीलकुमार, देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांनी मेहनत घेऊन प्रचार केला. बिहारच्या विकासासाठी जनतेने एनडीए ला स्पष्ट बहुमत देऊन पुन्हा संधी दिल्याबद्दल बिहारच्या जनतेचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हार्दिक आभार मानले आहेत.
भाजप बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष बनेल असं चित्र सद्या समोर येत आहे. तर, भाजप जरी पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनत असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने दिलेल्या वचनाप्रमाणे मुख्यमंत्रीपदी नितीशकुमार यांचीच निवड केली जाईल असं भाजप नेते सद्या सांगत आहेत. त्यामुळे, महाराष्ट्रात जसं सत्ताबदल घडला त्यातून शिकवण घेत भाजपने राज्यातील पक्षाला महत्व देईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- ऑनलाईन पेमेंट केल्याचे मेसेज दाखवून फसवणूक करणारी टोळी जेरबंद!
- बिहारमध्ये वाजतोय फडणवीसांचा डंका!
- अण्णासाहेबांचे चिरंजीव सक्षमपणे नेतृत्व करत असताना महामंडळ बरखास्त का केलं ?
- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त…
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
