🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- दुकानात वस्तूंची खरेदी करून दुकानात लावण्यात आलेला क्युआर कोड स्कॅन करायचा व एका अँड्रॉइड ॲपचा वापर करत ऑनलाइन पेमेंट केल्याचा खोटा एसएमएस पाठवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीचा नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी संजय अशोक सोनार, शुभम भगवान सोनवणे, रवी उत्तम पटेल, राजू श्रीहरीलाल गुप्ता ( सर्व रा.भोसरी, पुणे) या चार आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून २ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नगर-सोलापूर रोडवर सिद्धी पेट्रोल पंप येथे ८ नोव्हेंबरला एका कारमधून चार जण आले. त्यांनी या कारमध्ये तीन हजार रुपयांचे पेट्रोल भरले. तसेच ऑनलाइन पेमेंट करतो, असे सांगून पेट्रोल पंपावरील क्युआर कोड स्कॅन केला. त्यानंतर ऑनलाइन पेमेंट झाल्याचा मेसेज पेट्रोल पंपावर असणाऱ्या व्यवस्थापकाला दाखवला. त्यानंतर हे चौघे भरधाव कारमधून निघून गेले. पेट्रोल पंपावरील व्यवस्थापक प्रमोद खरे यांनी पेट्रोल पंपाचे खाते चेक केले असता, तीन हजार रुपये जमा झाले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संबंधित कारमधील व्यक्तीने खोटा एसएमएस दाखवून फसवणूक केल्याचे लक्षात येताच, व्यवस्थापक खरे यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार भिंगार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना माहिती मिळाली की, ‘दरेवाडी शिवारात संबंधित गुन्ह्यातील आरोपी फिरत आहेत. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेली ती कार पोलिसांना दरेवाडी भागात दिसली. या कारला घेराव घालून पोलिसांनी आरोपी संजय सोनार, शुभम सोनवणे, रवी पटेल, राजू गुप्ता यांना ताब्यात घेतले. आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच हा गुन्हा तंत्रज्ञानाचा वापर करून कशा पद्धतीने केला जातो, याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, पोलिसांनी आरोपींकडून फसवणूक करून चोरी केलेले दोन मोबाइल, विविध कंपन्यांचे बूट व सॅंडल, गुन्हा करण्यासाठी वापरलेली कार असा एकूण २ लाख ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये वाजतोय फडणवीसांचा डंका!
- बिहारमध्ये कॉंग्रेसच्या गचाळ कामगिरीमुळे महागठबंधन पराभवाच्या छायेत
- ‘कॉंग्रेसला अधिक चांगली कामगिरी करता आली असती तर तेजस्वी यादव हेच मुख्यमंत्री झाले असते’
- मोठी बातमी : मंत्री धनंजय मुंडे लीलावती रुग्णालयात दाखल
- पद्मश्री राहिबाई पोपरे यांच्या मदतीला आमदार लंके गेले धावून; केली ही मदत…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
