Share

जयंत पाटलांच्या जाहिरातबाजीवरून सोशल मीडियावर गोंधळ

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत म्हणून प्रशासनाने मोफत अन्नधान्य वाटप केले आहे. मात्र ही मदत करताना भाजप सरकारने जोरदार जाहिरातबाजी केली आहे. या जाहिरातबाजीवरून फडणवीस सरकार सकाळपासून चांगलेच टोले खात आहे. तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी देखील आपण मदत करत असल्याची जाहिरातबाजी केली असल्याचा फोटो व्हायरल झाला होता. मात्र जयंत पाटील यांचा व्हायरल झालेला फोटो खोटा असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

जयंत पाटील यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील आपत्तग्रस्तांना मोठी मदत केली आहे. तसेच पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी ते स्वतः पाण्यात उतरले होते. मात्र जयंत पाटील यांची बदनामी करण्यासाठी आणि स्वतःची चूक झाकण्यासाठी भाजपच्या आय टी सेलकडून जयंत पाटील यांचा बनावट फोटो व्हायरल केला असल्याचे राष्ट्रवादी पक्षाकडून सांगितले जात आहे. तसेच हे कट- कारस्थान भाजपचेचं असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यांनी फेसबुकवर टाकलेल्या फोटोमध्ये पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या बॉक्सवर जयंत पाटील यांचे स्टीकर लावलेले असल्याचा फोटो व्हायरल झाला होता.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!