मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर यायला लागली असून, आता तीन पक्षातील विसंवाद जाहीरपणे दिसून येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यातच आता माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार आरोप केले असून, शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे.
राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. मग जर दोन कॉंग्रेस जर एक होऊ शकत नाहीत तर मग आम्ही त्यांच्या विचारांचे होणे शक्य नाही. जरी राज्यात आघाडी सरकार असले तरीही आम्ही आघाडी सैनिक नाही आहोत. आम्ही शिवसैनिक आहोत शिवसैनिकच राहणार आहोत असं म्हणत त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान यावर आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील भाष्य केले आहे. ‘एका विशिष्ट उद्देश्याने सोबत आलेले हे तिन्ही पक्ष आहेत. त्यांचे काही तरी राजकीय प्रॉब्लेम आहेत म्हणून ते सोबत आहेत. आता अनंत गीतेंनंतर एक एक जण प्रेस घेईन आणि अशाच प्रकारची वक्तव्ये करतील. तसेच सत्तेसाठी तिन्ही पक्षांनी तडजोड केली आहे. अमर अकबर अॅन्थनी यांची तीन तोंडं तीन दिशेला आहे.
त्यांच्या अनेक समस्या आहेत म्हणून एकत्र आहेत. हे एकमेकांवर आरोप करत राहतील आणि सत्तेसाठी एकत्रही देखील राहतील. असो पण मी आणि सुभाष देसाई कोणती भाषा वापरतो, कसं बोलतो, यावरून राजकीय दिशा समजून घ्या,’ असे सूचक संकेत देखील यावेळी रावसाहेब दानवे यांनी यावेळी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ३५ कोटींच्या निविदा मंजूर झाल्यानंतर सत्ताधारी विरोधक आमनेसामने; सेनेच्या विरोधात भाजपा न्यायालयात जाणार
- महंत नरेंद्र गिरी प्रकरणामुळे चर्चेत आलेले आनंद गिरी नेमके कोण आहेत ?
- महंत नरेंद्र गिरी प्रकरणात मी दोषी असल्यास मला कायद्याप्रमाणे शिक्षा द्या – आनंद गिरी
- नरेंद्र गिरी यांना मी परवाच भेटलो होतो, त्यामुळे त्यांच्या मृत्यूमुळे मला धक्का बसला आहे : मौर्य
- महंत नरेंद्र गिरी यांची आत्महत्या की हत्या ? पोस्टमार्टमच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष


