नवी दिल्ली – आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह संदिग्ध अवस्थेत सापडला होता. महंत नरेंद्र गिरी यांच्या अल्लापूर या येथील बाघंबरी या ठिकाणच्या निवासस्थानी हा मृतदेह सापडला असून पंख्याला लटकून त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतंय. त्या ठिकाणी सापडलेल्या सुसाईड नोटवरुन पोलिसांनी महंत नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरी याला अटक केली आहे.
पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली असून या सुसाईड नोटमध्ये शिष्य आनंद गिरी हा आपल्याला त्रास देत असल्याचं सांगितलं आहे. तसेच या नोटमध्ये आपला वारस कोण असावा, मठ आणि आश्रममध्ये भविष्यात कशा प्रकारचे काम करण्यात यावं, कशा प्रकारची व्यवस्था असावी या सगळ्याची माहिती दिली आहे. महंत नरेंद्र गिरी यांची सुसाईड नोट ही एक प्रकारचे मृत्यूपत्रच असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
दरम्यान, अटकेपूर्वी आनंद गिरीने माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की, महंत नरेंद्र गिरी यांची ही आत्महत्या नसून ती हत्या आहे. यामध्ये कुणाचा सहभाग आहे याचा खुलासा पोलिसांनी करावा असंही त्यांनी म्हटलं होतं.आपल्या विरोधात मोठे षड्यंत्र रचले गेले आहे. जर या प्रकरणात आपण दोषी सापडलो तर आपल्याला कायद्याप्रमाणे शिक्षा देण्यात यावी असं आनंद गिरी यांनी आधीच स्पष्ट केलं होतं.
कोण आहेत आनंद गिरी?
आनंद गिरी हे उत्तराखंडचे रहिवासी असून ते निरंजनी आखाड्याचे सदस्य होते. त्यांनी संत परंपरेचं योग्य पालन न केल्याचा आरोप केल्याचा आणि आपल्या कुटुंबीयांसोबत कायम संपर्क ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. याच कारणातून महंत नरेंद्र गिरी यांनी आनंद गिरींची निरंजनी आखाड्यातून हकलपट्टी केली होती. नरेंद्र गिरी आणि आनंद गिरी यांच्या वादातील मुख्य कारण बाघंबरी पीठाची गादी असल्याचं बोललं जात आहे.
आखाड्यातून हकलपट्टी झाल्यानंतर आनंद गिरी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल करत, गुरू महंत नरेंद्र गिरी यांच्यावर अनेक आरोप केले होते. तसेच त्यांनी आश्रमाची जमीन परस्पर विकल्याचा आरोपही आनंद गिरी यांनी केला होता. त्याच बरोबर त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत सुरक्षा पुरवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. पण या नाट्यानंतर आनंद गिरी आणि नरेंद्र गिरी यांच्या समेट झाला होता. आनंद यांनी गुरू नरेंद्र गिरींचे पाय धरून माफी देखील मागितली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘इस्लामविरोधी कंटेंट’; तालिबानने अफगाणिस्तानमध्ये आयपीएल प्रक्षेपणास घातली बंदी
- राज्यकर्ते अराजकता माजवत आहेत आणि जनता असहाय्य आहे, न्याय कुणाकडे मागावा ?
- महंत नरेंद्र गिरी प्रकरणात मी दोषी असल्यास मला कायद्याप्रमाणे शिक्षा द्या – आनंद गिरी
- चंद्रकांत पाटील यांनी स्वत: खाल्ले पण दिसू दिले नाही; नाना पटोले यांचा घणाघात
- महंत नरेंद्र गिरी यांची आत्महत्या की हत्या ? पोस्टमार्टमच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

