🕒 1 min read
उस्मानाबाद: राष्ट्रीय महामार्गाचे कामे काही ठिकाणी अर्धवट असल्याने अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकराणाचे काम सुरु आहे, काही ठिकाणी कामे अर्धवट राहिल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यातच अपघातांचे सुद्धा प्रमाण वाढल्याने हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशा सूचना आमदार चौगुले यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान रस्ते सुरक्षा विषयक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली, यावेळेस त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना उर्वरित कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही ठिकाणी अर्धवट कामे असल्याने अपघात होत असल्याने या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.
महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे असून, एकाही उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले नाही. महामार्गालगत ड्रेनेज व्यवस्था नसल्याने शेतकरी व ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात ही कामे पूर्ण करण्याची सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी चौगुलेंनी दिल्या. महामार्गाच्या उर्वरित कामासाठी निधीची तरतूद होणे, भूसंपादन प्रक्रियेतील उर्वरित निधी संबंधीत शेतकरी, जागा मालकांना त्वरित मिळवून देणे आदींबाबत एका संयुक्त शिष्टमंडळाद्वारे रस्ते व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांची पुढील महिन्यात भेट घेण्याचा ठराव बैठकीत घेण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- आणखी दोन दिवस राज्यात पाऊस बरसणार, बळीराजाच्या चिंतेत वाढ
- राष्ट्रपती राजवटीची मागणी तर महिन्यातून दोन-तीन वेळा होते,त्यात नवीन काय?
- ‘तान्हाजी’ नंतर पुन्हा एकदा ऐतिहासिक चित्रपटात झळकणार अजय-काजोलची जोडी
- यू ट्यूब घेत आहे नवीन फिचरची चाचणी; कॉपी कंटेंटला बसणार चाप
- “लोगों का काम है कहेना, बेकार की बातों में कहीं बीत ना जाये रैना…”, कोहलीची के.एल. राहुलसाठी बॅटिंग


