Share

वडिलांच्या निधनाच्या तिसऱ्याच दिवशी अख्या कुटुंबाने केले रक्तदान, टिंगरे कुटुंबाचे होतेय कौतुक

Published On: 

बारामती – एखाद्या कुटुंबात कोणाचं निधनं झालं तर त्या कुटुंबात तेरा दिवस दुखवटा पाळायची पद्धत आपल्या समाजामध्ये रुजली आहे. मात्र एखाद सामान्य कुटुंबातील महत्वाच्या व्यक्तीचं निधनं झाल्यानंतर त्यांतून झालेलं दुःख बाजूला सारून सामाजिक जान ठेवुन कुटुंबीयांनी तिसऱ्या दिवशी रक्तदान करून समाजपुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

बारामती तालुक्यातील झारगडवाडी या गावात टिंगरे कुटुंबीय वास्तव्यास आहे. शंकर टिंगरे हे त्यांचा पिढीजात लोहारकामं हा व्यवसाय करत होते. सर्व सामान्य आणि अल्प शिक्षण झालेलं हे कुटुंबं गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात हिरहिरीने सहभागी होत असते. शंकर टिंगरे यांना गेल्या काही तीन वर्षांपासून मेंदूचा आजार जडला होता. त्यामुळे ते दोन वर्षांपासून अंथुर्णाशी खिळून होते. दि. 7 जून रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्याच दिवशी कोरोनाच्या होणाऱ्या प्रसाराचा विचार करून कुटुंबियानी कोणत्याही लांबच्या पाहुण्यांना बोलावयाचे नाही असा निर्णय घेतला आणि अवघ्या तीन तासात अंत्यविधी उरकून घेतला.

त्यानंतर तिसऱ्या दिवशी हिंदू धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे सावडण्याच्या विधी असतो. हा विधी उरकल्यानंतर शंकर टिंगरे यांचा धाकटा मुलगा मच्छिन्द्र टिंगरे यांनी आपण रक्तदान करून वडिलांना श्रद्धांजली वाहिली पाहिजे असा विचार कुटुंबीयासमोर मांडला. सामाजिक जाणीव असलेल्या कुटुंबात या विचारला लगेच होकार मिळाला आणि सर्व कुटुंबीय रक्तदानासाठी तयार झाले. बारामतीच्या चंदुलाल शहा या रक्तपेढीत रक्तदान केले. मानसिक स्तिथी चांगली नसताना टिंगरे कुटुंबीयांनी केलेल्या या सामाजिक कामाचे परिसरात कौतुक होत आहे.

‘या’ देशाने दर्शवली आयपीएलचं आयोजन करण्याची तयारी

बच्चू कडू अविरत समाजसेवक ‘ ही ‘ बातमी वाचून तुम्हाला बच्चू कडूंविषयी आदर नक्कीच वाढेल

‘केंद्र सरकार शक्य ते करून दाखवत आहेतच, आता तुम्ही काहीतरी करून दाखवा’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!