Share

पीक नुकसानीचे पंचनामे ४८ तासात पूर्ण करा, अमित देशमुखांचे आदेश

Published On: 

बीड : राज्यात अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अजूनही पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. या नुकसानीचे पंचनामे ४८ तासात पूर्ण करून प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्याचे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिले.

गेवराई तालुक्यातील खांडवी येथे भेट देऊन मंत्री अमित देशमुख यांनी अतिवृष्टीच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, माजी आमदार अमरसिंह पंडित, राजकिशोर मोदी, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार सचिन खाडे आदी उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख म्हणाले, परतीच्या पावसामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. बराच ठिकाणी 130 ते 200 टक्क्यापर्यंत जास्त पाऊस झाल्याने शेत पिकांबरोबरच खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे देखील राज्यात नुकसान झालेले आहे. यासाठी केंद्र सरकारकडून मदत व्हावी म्हणून प्रस्ताव पाठविण्यात आले असून राज्य सरकार शेतकऱ्यांना या नुकसानीमध्ये मदत करण्यासाठी पुढे आलेले आहे. राज्य शासनाने गांभीर्याने अतिवृष्टीच्या नैसर्गिक आपत्तीकडे पाहताना शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहण्याची भूमिका घेतली आहे, असे अमित देशमुख म्हणाले.

ते म्हणाले, तातडीची मदत करण्याची होणारी मागणी विचारात घेता मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत राज्य शासन निर्णय घेतला जाईल. तसेच नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारला देखील सादर करण्यात येईल, असे मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

खांडवी येथे शेतात जाऊन मंत्री देशमुख यांनी केली पाहणी

गेवराई तालुक्यातील खांडवी येथे आज वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी वसंत हरिभाऊ शिंदे या वयोवृद्ध शेतकऱ्यास धीर दिला. यावेळी त्यांच्या कापसाच्या शेतात साचलेल्या पाण्यामुळे हातात आलेले पीक वाया गेल्याची भावना शेतकरी शिंदे यांनी बोलून दाखविली. तसेच यावेळी तूर आणि सोयाबीन ही पिके देखील अति पावसामुळे वाया गेल्याचे त्यांना दिसून आले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!