Share

श्रीरामपूर जिल्हा निर्मितीचा लढा तीव्र करण्याच्या हालचाली सुरू !

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : कोरोनाची संकटकालीन परिस्थिती पुर्वपदावर येत असताना श्रीरामपूर जिल्हा निर्मितीच्या चळवळीला नव्याने चालना देण्यासाठी आयोजित ऑनलाईन बैठक नुकतीच पार पडली. कोरोनाच्या संकटातही श्रीरामपूर जिल्हा निर्मितीचा लढा सुरुच आहे. निवडणुकीपूर्वी सुरू असलेली चळवळ कोरोनामुळे थांबली होती. जिल्ह्याचे विभाजन करून उत्तरेत जिल्ह्याचे ठिकाण कोणते करायचे, यावरून गदारोळ सुरू होता. श्रीरामपूर, संगमनेर असा प्रश्न असताना आता ही चळवळ पुन्हा जोर धरू लागली आहे.

श्रीरामपूर जिल्हा निर्मितीची जोरदार हाक थेट अमेरिकेतूनही नुकतीच देण्यात आली. तसेच आगामी प्रजासत्ताक दिनापासून श्रीरामपूर जिल्हा निर्मितीचे आंदोलन अधिक तीव्र होणार आहे. जिल्हा विभाजन, नवीन जिल्हा निर्मितीबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त प्रधान सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर झालेला आहे. त्याचा मंत्रालयीन पातळीवर श्रीरामपूर जिल्हा कृती समितीने पाठपुरावा करावा, अशी सूचना मिलिंद साळवे यांनी केली. समितीच्या माध्यमातुन प्रसारित होणाऱ्या राजकीय पोस्ट्सवर नाराजी व्यक्त करीत यापुढे अशा पोस्टस् टाळून सदस्यांनी समितीच्या मंचावर जिल्हा निर्मिती कार्याच्या दृष्टीने चर्चा होण्याची अपेक्षा प्रताप भोसले यांनी व्यक्त केली.

लवकरच समितीची पुढील बैठक होणार असून, आमदार लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्यासह नगरसेवक व इतर सर्व पक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी बैठकीत सहभागी होणार आहेत. आंदोलनाच्या दृष्टीने काही ठोस सूचना समितीच्या विचाराधीन आणाव्यात, असे तिलक डुंगरवाल, शरद डोळसे यांनी सांगितले.

ऑनलाइन बैठकीला श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रताप भोसले यांनी थेट अमेरिकेतून बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले. समितीचे पदाधिकारी, सदस्य विविध ठिकाणाहुन बैठकीत सहभागी झाले होते. समितीचे अध्यक्ष बाबासाहेब औताडे, सुनंदा आदिक, सुरेश ताके, शरद डोळसे आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!