🕒 1 min read
Rituja Latke । मुंबई : राज ठाकरे यांच्या पत्रानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांची मतं लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं होतं. यानंतर भाजप नेत्यांच्या बैठका सुरु झाल्या. यामध्ये भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी अर्ज मागे घेतला आणि अपक्ष म्हणूनही लढणार नाहीत असा निर्णय घेतला. यानंतर ऋतुजा लटके यांची बिनविरोध निवड झाली.
ऋतुजा लटके यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर भाजपाने आपले उमेदवार मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. मुरजी पटेल यांनी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानं लटके यांचा विजय जवळपास निश्चित माणला जात आहे. मात्र आता ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीव आक्षेप घेण्यात आल्यानं त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
ऋतुजा लटके यांच्या उमेदवारील अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी निवडणुकीतून माघार घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप मिलिंद कांबळे यांनी केला आहे. त्यांनी याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली आहे, सात दिवसांच्या आत उत्तर न आल्यास आपण न्यायालयात जाणार आहोत असा इशाराही मिलिंद कांबळे यांनी दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ऋतुजा लटके यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrakant Khaire | आदित्य ठाकरेंना ‘छोटा पप्पू’ म्हणणाऱ्या अब्दुल सत्तारांवर चंद्रकांत खैरेंचा हल्लाबोल, म्हणाले…
- Prasad Lad | प्रसाद लाड यांचा उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाईंना इशारा, म्हणाले…
- Gogoro Electric Scooter | तैवान मधील ‘हि’ इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच भारतामध्ये होणार लाँच
- Chandrakant Patil । “त्यांना आता साक्षात्कार झाला आहे”; आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर चंद्रकात पाटलांची टीका
- Job Alert | राज्यातील पोलीस दलात ‘या’ पदांसाठी लवकरच सुरू होणार भरती प्रक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
