🕒 1 min read
Chandrakant Patil | मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर भाजपा नेते चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांनी टीका केली आहे. “महात्मा गांधींसारखे नेते निर्माण झाले याचं कारण की ते देश फिरले, सर्वसामान्य माणसांचं मन समजून घेतलं, हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना उशिरा कळलं. यांना बराच काळ असं वाटलं की मातोश्रीमध्ये राहुनच माणसांची दु:ख कळतात. मात्र, आता त्यांना साक्षात्कार झाला आहे”, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मागच्या काही दिवसांपूर्वी वेदांता फॉक्सकॉन ही कंपनी महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आली. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत फोन पे ही कंपनीही मुंबईतून आपले ऑफिस बंगळुरूला हलवण्याचा निर्णय घेतला यावरून राजकारण राज्यातील विरोध पक्षांकडून सरकारला जाब विचारत असतानाच आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेल्याचं समोर येत आहे.
टाटा आणि एअरबस या कंपनीचा प्रोजेक्ट गुजरातच्या बडोद्यामध्ये गेला आहे. यावरून आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. या प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरेंना सुनावलं आहे. प्रत्यक्ष मैदानात उतरल्यावर मागण्या करताना आपण सत्तेत असताना या गोष्टी केल्या नाहीत, याची आठवण ठेवावी, असा सल्लाही पाटलांनी ठाकरे पिता-पुत्रांना दिला आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरेंनी नुकताच नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांचा दौरा केला आहे. प्रशासनाला तातडीने मदत करायला लावू, असे आश्वासन ठाकरे यांनी शेतकऱ्यांना यावेळी दिले आहे. चंद्रकांत पाटलांच्या या टीकेला ठाकरे काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- “टीम इंडिया सेमी फायनलमध्ये…” ; शोएब अख्तर ची भविष्यवाणी, पाक संघावर संतापला
- Abdul Sattar “छोटा पप्पू आत्ता जे बोलतोय…”; अब्दुल सत्तारांची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका
- Abdul Sattar | ‘दारू पिता का?’ प्रश्नावर अब्दुल सत्तारांनी दिलं स्पष्टीकरण म्हणाले…
- Women Cricket | महिला क्रिकेट खेळाडूंसाठी BCCI ने घेतला ऐतिहासिक निर्णय
- Uddhav Thackeray | C-295 प्रकल्पावरून ठाकरे गटाचा शिंदे सरकारवर हल्ला, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
