Share

स्पर्धा परीक्षेचा आभास ! विद्यार्थ्यांना वास्तव सांगण्याची गरज

Published On: 

सत्यम जोशी : पुण्यात शास्त्री रोडला एका खानावळ मध्ये जेवायला गेलो होतो. जेवण ऑर्डर करण्यासाठी मित्राने वेटर ला आवाज दिला हॉटेल मध्ये गर्दी असल्याने तो गोंधळलेला दिसत होता त्याच्या ऑर्डर लक्षात आली नाही मग अचानक मित्र त्याला म्हंटला ऑर्डर लिहून देतो. त्याने एकदम त्वेषाने त्या मित्राकडे बघितलं आणि रागाने त्याला म्हंटला मला लिहिता वाचता येत मी शिकलेलो आहे. मी पाच वर्षांपासून एमपीएससी करतोय. मित्राचा हेतू शुद्ध होता त्याला दुखवण्याचा मित्राचा कुठलाही उद्द्येश्य नव्हता. पण या स्पर्धेच्या युगातील तणाव त्याने रंगाच्या माध्यमातून बाहेर काढला.

आपल्याकडे सोशल मीडिया वर ट्रेंड चालतात तसेच काही ट्रेंड काही वर्षांपासून शिक्षणात देखील चालू आहे. ९० च्या दशकात डीएड , बीएड चा ट्रेंड आला होता तो ट्रेंड २००४ आणि २००५ पर्यंत कायम होता मग तेव्हापासून आजपर्यंत इंजिनीरिंग आणि मेडिकल चा ट्रेंड चालू आहे. पण काही ट्रेंड हे विशिष्ठ काळानंतर संपतात आणि काही कमी होतात. या सगळ्या मध्ये एक ट्रेंड मोठाच होत गेला त्या ट्रेंड स्वरूप इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलं की तो ट्रेंड थांबावने आता अवघड होतय. त्या ट्ट्रेंड च आता कंमेर्सिअलिझशन मोठ्या प्रमाणात झालाय, त्यात अनेक लोक करोडपती , हिरो झाले आहेत तर अनेक लोक रोडपती, झिरो झाले आहेत.

या ट्रेंड च नाव आहे स्पर्धा परीक्षा. स्पर्धा परीक्षेचं लोन हे एखाद्या ढेकणासारख आहे ढेकण कसा मारले की वाढतात अगदी तसच. आता ढेकणांबद्दल स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांपेक्षा कोणाला जास्त माहिती असणार. सध्या आपल्याकडे बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न आहे. अशातच अनेक विद्यार्थी हे लाखोंच्या संख्येने डिग्री घेऊन प्रत्येक वर्षी बाहेर पडतायेत. यामध्ये अनेक मुलांचं कॉलेज मधून प्लेसमेंट होत तर काहींना ओळखीने कुठे तरी जॉब भेटतो पण बाकीच्यांचं काय?मग आता पुढे करायच काय ? घरचे आणि नातेवाईक विचारणार काय चाललंय सध्या?

त्यावेळी सगळ्यांना एक चांगलं उत्तर बाहेर येते आणि ते म्हणजे स्पर्धा परीक्षा. डिग्री झाल्यानंतर अनेक जण ठरवतात की १ ते २ वर्ष आपल्याला स्पर्धा परीक्षेला द्यायचे पण कधी त्याचे ७ ते ८ वर्ष निघून जातात हे त्यालाही काळात नाही पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. वय वाढलेलं असत, इंटरव्हिव ला गेल्यानंतर पहिला प्रश्न विचारल्या जातो डिग्री होऊन एवढे वर्ष झाले पण त्या प्रश्नाला उत्तर नसत आणि मग यातूनच निराशा वाढायला सुरुवात होते, मग तणाव वाढायाला लागतो. घरच्यांना सुद्धा कंटाळून म्हणाव लागत तू तुझ बघ आता. या सगळ्याची सुरूवा होते ती मोबाईल पासून. विद्यार्थी गावाकडे असताना मोबाईल वर जिद्द, चिकाटी , मेहनत ,आत्मविश्वास ,संघर्ष , दृढता ,निश्चय अशे मोठे मोठे दोन,तीन लोकांचे भाषण(स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचे आयडॉल असलेल्या ) बघतो. आणि ते कसे १० ते १२ वेळेस अपयशी झाले हे डोकयात घेऊन तो त्याचा मोर्चा पुण्याकडे वळवतो. पुण्याकडे का? कारण हे दोन, तीन पण पुण्यातच असतात.

घरची परिस्थिती नसताना सुद्धा आपल्या मुलाला पुण्यात शिकायला पाठवतात. कारण प्रत्येक मायबापाचं स्वप्न असते की आपला मुलगा यशस्वी होऊन सेटल झाला पाहिजे. हीच त्यांची प्रामाणिक इच्छा असते. आई-वडील म्हणता वेळ पडली तर जमीन विकू पण करू. मग पोरग गावाकडून पुण्यात येते. मग त्याची हॉस्टेल किंवा रूम ची शोधाशोध सुरु होते त्याच काही मित्रही दोन ते तीन वर्षपासून पुण्यात राहत असतात. मग पुण्यातील पेठेत कुठल्यातरी वाड्यात त्याची राह्यची व्यवस्था होते.

पुण्यात जे काही चार, पाच नावाजलेले आणि करोडो रुपये कमावलेले क्लासेस आहेत ते देखील पेठेतच आहे. हा मुलगा मग एक ते दोन लाख रुपये फी भरून क्लास लावतो. पहिल्याच दिवशी सगळ्या क्लास मध्ये सारख्याच लोकांनां त्यांच्याच क्लास चे म्हणून सत्कार समारंभ आयोजित केला जातो. मुळात हा सत्कार समारंभ एखाद्या ग्रँड इव्हेंट पेक्षा कमी नसतो. हा विद्यार्थी शहरात पहिल्यांदाच गावाकडून आलेला असतो त्यामुळे रौंपण असल्यामुळे साहजिकच अनेक मित्र-मैत्रिणी भेटत मग ग्रुप तयार होतो. मग हळूहळू चहा चे प्लॅन बनायला सुरुवात होते.मग त्या चहा पिण्यात यांचे दिवसातले चार ते पाच तास कशे जायाला लागतात हे त्यांना देखील काळत नाही.

तिकडं तोपर्यंत बापानं एक एक्कर शेत विकलेल असत. असं नाही की पोरग अभ्यास नाही करत, बाहेर शिकणाऱ्या प्रत्येक पोराला वाटत असत की आपण काही तरी केलं पाहिजे, त्यामुळे ते पोरग पण मन लावून अभ्यास करत असत पण मग वर्षानुवर्षे जागाच निघत नाही आणि जागा निघाल्या तरी १००० च्या वर कधी निघत नाही आणि त्या जागांसाठी लाखोंच्या संख्येने फॉर्म येतात बार हे सर्व लाखो जण सगळं सारखं अनुसरण करत असतात त्यामुळे हे १००० सोडले तर बाकीच्यांना पुढच्या वर्षी पर्यंत थांबण्यापेक्षा पर्याय नसतो पुन्हा तेच चक्र दरवर्षी परत परत चालते.

एक लक्षात घेतलं पाहिजे १० तर फार १०००० विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन नौकरीला लागतात पण बाकीच्यांचं काय? त्यांच्या पोट पाण्याचं काय? त्यांच्या घरच्यांचं काय? त्यांचा जो वेळ काय ? अशे अनेक प्रश्न मात्र अनुत्तरित राहतात . त्यामुळे आता कुठे तरी असा म्हण्याची वेळ आली आहे युट्युब वर एखाद सपर्धा परीक्षेसाठी डीमोटिवेटिंग भाषण वायरल झाल पाहिजे.
 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!