🕒 1 min read
मुंबई : काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची बैठक घेऊन विविध मुद्यावर चर्चा केली. त्यानंतर आता मुंबईमध्ये दुकान आणि हॉटेल रात्री १२ पर्यंत सुरु राहणार आहे अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच राज्यातील इतर शहरात स्थानिक प्रशासन योग्य तो निर्णय घेईल असेही टोपे यांनी सांगितले.
कोरोना रुग्णाची संख्या हळू-हळू कमी होत असल्याने नियमांची शिथिलता राज्य सरकार कडून देण्यात येत आहे असे समजते. 22 ऑक्टोबरपासून आपण चित्रपटगृहे, नाट्यगृहे हेही सुरू करीत आहोत. तसेच अम्युझमेंट पार्क देखील त्याच दिवशी सुरु होतील. कोरोनावरील उपचारांसाठी जगात नवनवीन प्रयोग होत असून येणाऱ्या नवीन औषधांच्या बाबतीतही त्यांची परिणामकारकता, किंमत, उपलब्धता याबाबत आत्तापासूनच माहिती घेत राहावी व संबंधितांच्या संपर्कात राहावे असेही मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, राज्यात दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम असून नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे व हात स्वच्छ धूणे हि काळजी प्रत्येक नागरिकने घेणे गरजेचे आहे. लोकांनी बेसावध राहू नये म्ह्णून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी, असे वेळीवेळी राज्य सरकारकडून सांगण्यात येते.
महत्वाच्या बातम्या
- ‘ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गृहमंत्री नाकारले’
- ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतंय; काँग्रेसची मोदींवर वादग्रस्त टीका
- पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं? विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरुन राऊतांचा मोदींना टोला
- पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत
- ‘रवी राणांनी जे केलंय ते चिल्लरगिरी, स्वतःला शेतकऱ्यांचं कैवारी समजतात आणि पदोपदी नौटंकी’

