Share

दिलासादायक! डोंबिवलीतील ओमिक्रॉनबाधिताच्या संपर्कातील सर्व जण निगेटिव्ह

Published On: 

मुंबई : डोंबिवलीत एक तरुण ओमिक्रॉन पॉझिटीव्ह आढळून आल्यानंतर प्रशासनाची झोप उडाली असून आरोग्य विभागाला सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या तरुणाच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात आली यामध्ये सर्व जण निगेटिव्ह आढळून आल्याने दिलासा मिळाला आहे.

ओमिक्रॉनबाधित तरुण मरीन इंजिनिअर आहे. त्याने लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता. दक्षिण आफ्रिकेत होणारा वेगानं प्रसार लक्षात घेता तो पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागानं सतर्क होऊन, नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशी माहिती राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली आहे. जिनोमिक सिक्वेंसिगसाठी पाठवलेल्या नमुन्यांमध्येसुद्धा पॉझिटिव्ह येण्याची शक्यता आहे.

सध्या या रुग्णाला सौम्य लक्षणं असून त्याच्यावर कोणतेही विशेष उपचार सुरू नाहीत. आम्ही आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कसून तपासणी करत आहोत, ओमिक्रॉनबाधित रुग्ण जेव्हा महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर आरटीपीसीआर सुविधा नव्हती, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे सर्वांनी आपली काळजी घ्या. असे अवाहनही त्यांनी केले आहे.

डोंबिवलीत आढळलेला हा देशातील चौथा रुग्ण

गुजरात कर्नाटक नंतर महाराष्ट्रात पहिला आणि देशातील चौथा रुग्ण डोंबिवलीत आढळून आला आहे. सदरील तरुण हा साऊथ आफ्रिकेत गेला होता. त्यानंतर दुबईला जाऊन भारतात पोहचला. तपासणीनंतर ओमिक्रॉन व्हेरियंट पॉझिटीव्ह आढळून आला आहे. सध्या या तरुणास कल्याण डोंबिवली येथील कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!