औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात नागरिक पॉझिटिव्ह आढळून आल्याने महापालिकेचे २१ कोविड केअर सेंटर फुल्ल झाले होते. त्यामुळे खासगी रुग्णालयांनी देखील ७३ कोविड केअर सेंटर सुरू केले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या झपाट्याने घटली आहे. शहरात सध्या केवळ ७० रुग्ण ॲक्टीव्ह असून, २५ जण घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे महापालिकेसह १८ खासगी रुग्णालयांनी देखील कोविड केअर सेंटर बंद केले आहेत.
शहरात मार्च २०२० पासून कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यावेळी महापालिकेने शहरात ठिकठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले तर शासनाने एमआयडीसीच्या माध्यमातून चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन कंपनीत तीनशे खाटांचे कोवीड हॉस्पिटल उभारून ते महापालिकेला चालविण्यासाठी दिले. या हॉस्पिटलसह महापालिकेने सुरू केलेले सर्व कोविड केअर सेंटर दुसऱ्या लाटेत अपुरे पडले. त्यामुळे सेंटरची संख्या वाढवून ती २१ पर्यंत नेली.
मात्र, आता रुग्णसंख्या कमी होतीच महापालिकेने कोविड केअर सेंटर बंद केले आहेत. त्यासासोबत खासगी रुग्णालये देखील कोविड केअर सेंटर बंद करण्यासाठी महापालिकेकडे अर्ज करत आहेत. आत्तापर्यंत १८ सेंटर बंद झाले असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. कोरोनाच्या साडेसात हजार रुग्णांवर उपचार करण्याची महापालिका, शासकीय रुग्णालये व खासगी रुग्णालयांची साडेसात एवढी क्षमता आहे. पण महापालिकेच्या शुक्रवारच्या (दि.९) अहवालानुसार फक्त ७० रुग्ण ॲक्टीव्ह होते.
उपचार घेत असलेले रुग्ण
घाटी रुग्णालय-३
जिल्हा सामान्य रुग्णालय-२
खासगी रुग्णालय-१८
मेल्ट्रॉन हॉस्पिटल-२०
कोविड केअर सेंटर-२
घरीच उपचार घेणारे-२५
महत्त्वाच्या बातम्या
- प्रदर्शनाआधीच चित्रपट विवादात ; फरहान अख्तरच्या ‘तुफान’वर लव्ह जिहाद पसरवण्याचा आरोप
- मोठी बातमी : लखनऊमध्ये बॉम्ब बनवणाऱ्या अल-कायदाच्या २ दहशतवाद्यांना अटक
- मुख्यमंत्री ठाकरेकडुन ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलांकाराना ‘माझा पुरस्कार’ प्रदान
- दहशतवादी संघटनांसाठी काम करणारे काश्मीर प्रशासनातील ११ कर्मचारी बडतर्फ
- ‘सोबत राहूनही पाठीत सुराच खुपसायचा असेल तर…’; पटोलेंच्या विधानाने आघाडीतील बिघाडी उघड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

