Share

दिलासा ! ‘२०२५ मध्ये पाचवी तर २०३० मध्ये ‘भारत’ तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था’ सीईबीआर

Published On: 

नवी दिल्ली: कोरोना या जागतिक महामारीच्या काळामध्ये जगातील सर्च राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांना मोठा आर्थिक फटका बसल्याने मंदीच्या छायेत आहेत. याला भारतीय अर्थव्यवस्था देखील अपवाद नाही. आता अनलॉक प्रक्रीये दरम्यान अर्थव्यवस्था हळू हळू रुळावर येत आहे. सरकार देखील अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी पावले उचलत आहे.

त्यानंतर आता सीईबीआर म्हणजेच सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च या एका थिंक टँकने दिलासादायक माहिती दिली आहे. भारतीय अर्थव्यवस्था अधिक विकसित अर्थव्यवस्था होईल, असा सीईबीआरचा अंदाज आहे.

भारत २०२५ पर्यंत जगातील 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश बनेल. सध्या भारत सहाव्या क्रमांकावर आहे. २०२५ मध्ये हे ब्रिटनला पछाडेल. तर २०३० मध्ये ही तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश बनेल. एका थिंक टँकने ही माहिती दिली आहे.

२०२० मध्ये ब्रिटनला मागे टाकत भारत पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश बनला होता. पण २०२० मध्ये हा सहाव्या क्रमांकावर आला. ब्रिटन या रँकिंगमध्ये २०२४ पर्यंत राहिल. कोरोनाचा जास्त प्रभाव आणि डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्याने भारत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च ने आपल्या वार्षिक रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे.

भारतीय अर्थव्यवस्था अधिक विकसित अर्थव्यवस्था होईल, असा सीईबीआर चा अंदाज आहे. २०२५ मध्ये त्याचा वार्षिक वाढीचा दर ५.८% असेल. या वाढीमुळे 2030 पर्यंत भारत तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल. येथे पोहोचण्यासाठी भारत युके, जर्मनी आणि जपानला मागे टाकेल. यूकेच्या या थिंक टँकनुसार 2028 पर्यंत चीन अमेरिकेला मागे टाकेल. याद्वारे चीन जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनेल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!