Share

कॉमेडी किंग जॉनी लिव्हर हास्यजत्रेच्या मंचावर लावणार हजेरी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कलर्स मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस पडत आहे. या शो मधील सर्वच कलाकार आपल्या विनोदी अंदाजात प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. यातील सर्वच कलाकारांनी अनेकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा सगळ्यांचा लाडका कार्यक्रम १८ जुलैपासून ‘रविवारची हास्यजत्रा’ या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे रविवारी २ तास हास्यजत्रा पाहायला मिळणार आहे. या शो  साठी प्रमुख पाहुणे म्हणून कॉमेडीचे किंग जॉनी लिव्हर येणार आहेत.  त्यामुळे या शोचे आणखी जास्त मनोरंजन होणार हे नक्की.

https://www.instagram.com/p/Bsqe9fDgalw/?utm_source=ig_web_copy_link

यावेळी जॉनी लिव्हर यांना नम्रता साकारत असलेलं लॉली हे पात्र अतिशय आवडतं आणि त्या पात्रासाठी त्यांनी नम्रताचं कौतुकही केलं. तसेच इतर कलाकारांचे देखील त्यांनी कौतुक केले आहे. या भागात प्रेक्षकांना जॉनी लिव्हर यांचा विनोदी अंदाज देखील पाहायला मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!