Share

दिवाळीनंतर राज्यातील महाविद्यालये सुरू करण्यात येतील; उदय सामंत यांचे सूचक विधान

Published On: 

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात कहर माजवला होता. आता कोरोनाची दुसरी लाट ही ओसरली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने ठाकरे सरकारने बऱ्यापैकी निर्बंध कायम ठेवले होते. शाळा, महाविद्यालये, मंदिरे, चित्रपटगृह, नाट्यगृह हे बंद ठेवण्यात आले होते. आता गणेशोत्सव काळानंतर देखील कोरोना स्थिती आटोक्यात असल्याने ठाकरे सरकारने अनेक गोष्टी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

शाळा येत्या ४ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहेत. तर, मंदिरे आणि सर्व धर्मियांचे प्रार्थनास्थळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी खुली केली जाणार आहेत. दुसरीकडे, चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे देखील ऑक्टोबर महिन्यात खुली केली जाणार आहेत. आता उच्च शिक्षणाची महाविद्यालये मात्र अद्यापही बंद असून याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

याबाबत आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केलं आहे. ‘१ नोव्हेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. मात्र, मागच्या वेळी गैरसमज असा झाला की, तेव्हापासून महाविद्यालयं सुरू होणार आहेत. १ नोव्हेंबरपासून महाविद्यालयं सुरू करावीत असं यूजीसी आणि एआयसीटीईचं म्हणणं आहे. मात्र आपल्याकडे त्या काळात दिवाळीचा सण असल्याने त्या काळात महाविद्यालये सुरू करता येणार नाहीत. त्यानंतरच कदाचित कॉलेज सुरू करण्यात येईल. आम्ही त्या विचारात आहेत.’ असे सूचक वक्तव्य उदय सामंत यांनी केले आहे.

तसेच यावर पुढे बोलताना ते म्हणाले कि, ‘सीईटीच्या परीक्षा झाल्याशिवाय, त्याचा निकाल लागल्याशिवाय कॉलेज सुरू करता येणार नाहीत. त्यामुळे ही परीक्षा लांबली तर महाविद्यालयं सुरू करण्याची तारीख अजून पुढे जाईल. ज्याठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, त्या ठिकाणी महाविद्यालये सुरू करण्यास हरकत नाही. याविषयी राज्य कृती दल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल.’ असे देखील सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!