औरंगाबाद : कोरोना रुग्ण वाढीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने ११ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत अंशतः लॉकडाऊन लागू केले आहे. दरम्यान रात्री ८ ते सकाळी ५ यावेळेत बाहेर निघण्यास बंदी आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवांनाच परवानगी दिली आहे. मात्र या काळात नियम मोडणाऱ्या अनेक हॉटेल्स, पेट्रोलपंप आणि गर्दीच्या ठिकाणी फिरत स्वत: जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त दररोज शहराचा आढावा घेत आहेत. मात्र यात मनपा आयुक्तांची अनुपस्थिती खटकत आहे.
शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता प्रशासनाने संगनमताने अंशत लॉकडाऊन जाहिर केले आहे. तसेच नुकतेच शहरात रात्री आठ नंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण आणि पोलीस आयुक्त निखील गुप्ता दररोज रात्री शहरातील विविध ठिकाणांची पाहणी करत आहे.
यात सोमवारी दोन्ही अधिकाऱ्यांच्या पाहणीत (दि.२२) पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या झोमॅटो बॉय कडून प्रोझोन मधील दुकाने सुरू असल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांनी प्रोझोन गाठून तेथील सुरू असणारी केएफसी, करीमस किचन, डोमिनोज आणि दुकाने सील केली.
पेट्रोल पंपावर होणारेे नियमांचे उल्लंघन निदर्शनास येताच तात्काळ कारवाई करत संबंधित पेट्रोल पंप देखील सील करण्यात आले. तसेच पुंडलिकनगर येथे मास्कचा वापर न करता रात्री पावणे दहाच्या सुमारास अनेक जण समूह करून गप्पा मारत होते.
हे निदर्शनास येताच जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांनी संबंधित पाच व्यक्तींवर कारवाई केली. चिस्तीया चौकीच्या पुढील रस्त्यावर देखील अशीच परिस्थिती होती यावेळी संबंधितांना बजावून, कोरोनाचे गांभीर्य सांगून, मास्क नसलेल्या एका मुलावर दंडात्मक कारवाई केली.
महत्त्वाच्या बातम्या
- वाझेंचा देशपातळीवरील मोठा गुन्हा; एनआयएने आणखी १५ दिवसांची कोठडी मागितली
- मराठवाडयात कृषी प्रक्रिया उद्योगात मोठ्या संधी : कुलगुरू डॉ. ढवण
- राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार ? अजित पवारांनी केलं महत्वाचं भाष्य
- कॉंग्रेसला मोठा धक्का; दिग्गज नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
- आता केवळ १०० रूपयात बघा नाटक; प्रशांत दामले यांचा निर्णय

