Share

७५ हजारांहून अधिक गणेश मूर्तींचे संकलन, विसर्जन; औरंगाबादकरांनी घडवले शिस्तीचे दर्शन!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : गत दोन वर्षांपासून आपण कोरोनाशी लढा देत आहोत. अजूनही कोरोनाचा पूर्णपणे संपलेला नाही. या पार्श्वभूमीवर यंदाही गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. गतवर्षीप्रमाणे यंदाही मनपाद्वारे विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील नऊ झोनमध्ये ४० ठिकाणी गणपती संकलन त्याबरोबरच शहरातील ९ विहिरी आणि स्मृतीवन तलावात विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली होती. शहरात एकूण ७५,८२६ मुर्तींचे मनपाने संकलन करून विसर्जन केल्याची माहिती मनपा प्रशासनाद्वारे देण्यात आली. विसर्जनाच्या कुठल्याही ठिकाणी अनुचित प्रकार झाला नाही असेही मनपाकडून सांगण्यात आले.

महापालिकेतर्फे दरवर्षी शहराच्या विविध भागात गणेश विसर्जनासाठी व्यवस्था केली जाते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीपासून गणेश मूर्ती संकलन केंद्रांमध्ये वाढ करण्यात आली असून विसर्जनाची संपूर्ण जबाबदारी मनपा प्रशासनाने हाती घेतली होती. ९ झोनमध्ये ४० ठिकाणी गणेश मुर्ती स्वीकरण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरीही तिसऱ्या लाटेची भीती तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनासाठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विसर्जन विहिरीवर न जाता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे मूर्ती द्याव्यात, असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले होते.

मनपाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी शिस्तीचे पालन करत गणेश मूर्ती जमा केल्या. रविवारी सकाळी मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्या हस्ते मनपाच्या वाहनांची पूजा करून ४० वाहने संकलनासाठी रवाना झाली. शहरातील ९ विहिरी, तसेच हर्सूल जवळील स्मृतिवन तलावात विसर्जन झाले. संकलन आणि विसर्जनात मनपाचे दीडशेहून अधिक कर्मचारी कार्यरत होते. ७५,२१६ घरगुती बाप्पा तर ६१० मोठे गणपती संकलित झाले होते. नागरिकांनी मनपा प्रशासनाला संपूर्ण सहकार्य केल्याचे मनपाद्वारे सांगण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!