Share

Maharashtra Winter Update | राज्यात थंडीचा कहर, तर ‘या’ ठिकाणी किमान तापमानाची नोंद

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये (Maharashtra) दिवसेंदिवस थंडी (Winter) चा कहर वाढत चालला आहे. गेल्या अनेक दिवसापासून राज्यात सर्वत्र दहा अंशापेक्षा तापमान (Temperature) कमी आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भ सर्वच ठिकाणी थंडीचा कडाका सुरू आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागासह शहरातही जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहे.

फेब्रुवारीपर्यंत असणाऱ्या या हंगामामध्ये दक्षिणेकडील राज्यात तसेच पश्चिम, उत्तर आणि मध्य भारताच्या काही भागांमध्ये सरासरी तापमान कमी राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, सध्या नुकतीच थंडीला सुरुवात झालेली असून थंडीचा कडाका अजून वाढू शकतो. तर, पश्चिम आणि उत्तर भारतातील काही ठिकाणी कमी थंडी राहण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे.

राज्यामध्ये गुरुवारी अनेक ठिकाणी तापमानात घसरण झाल्याचे दिसून आले होते. यामध्ये औरंगाबाद येथे 10.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. तर, पुण्यातही थंडी चांगलीच वाढलेली असून शहरात 11.9 अंश सेल्सिअस तापमान होते. हवामान खात्याने हिवाळ्यातील चार महिन्याचा अंदाज गुरुवारी जाहीर केला आहे. त्यानुसार, भारताच्या पूर्व, दक्षिण आणि उत्तर-पश्चिम भागातील बहुतांश ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. त्याबरोबर देशातील दक्षिण भागांमध्ये देखील काही ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहू शकते. त्याचबरोबर भारतातील दक्षिण भागात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाची नोंद झाली आहे. यामध्ये कोल्हापूरमध्ये 16.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले, तर महाबळेश्वरमध्ये १२.८ सेल्सिअस तापमान होते. त्याचबरोबर मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात 12.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर नांदेडमध्ये 13 अंश सेल्सिअस तापमान होते. त्याचबरोबर विदर्भातील अकोला शहरांमध्ये 14.2, अमरावतीमध्ये 13.7, बुलढाण्यामध्ये 14 अंश सेल्सिअस एवढे तापमान होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!