🕒 1 min read
कतार : फिफा विश्वचषक 2022 (FIFA World Cup 2022) ची संपूर्ण जगात चर्चा सुरू आहे. कतारमध्ये सध्या ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेसाठी जगभरातील फुटबॉल चाहते उत्सुक आहेत. अलीकडेच बॉलीवुड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fateh) हिने फिफा वर्ल्ड कपमध्ये डान्स परफॉर्मन्स दिला. या परफॉर्मन्सदरम्यान नोरा खूप उत्साही दिसली. त्याचबरोबर या परफॉर्मन्समध्ये नोराने जल्लोष करताना हातात तिरंगा घेऊन ‘जय हिंद’चा नारा दिला. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रमाणात वायरल होत आहे. आता तिरंगा घेऊन जय हिंदचा नारा देत असताना नोराकडून एक चूक झाल्याचे दिसून आले आहे. तिच्या या चुकीमुळे अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे.
नोरा फतेहीचा फिफा वर्ल्ड कपमधील डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नोरा लोकांनी खचाखच भरलेल्या स्टेजवर हातात तिरंगा घेऊन जय हिंद चा नोरा देताना दिसली आहे. नोरासोबत तिथे उपस्थित असलेले लोक देखील भारताचा जयघोष करताना या व्हिडिओमध्ये दिसले आहेत. यादरम्यान नोरा म्हणते की,”भारत फिफा वर्ल्ड कपमध्ये नसला तरी आम्ही या फेस्टिवलसाठी उपस्थित आहोत.” तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायला होत आहे.
‘या’ चुकीमुळे नोरा फतेही (Nora Fateh) झाली ट्रोल
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे नोराला कुणीतरी मंचावर तिरंगा देत आहे. तिरंगा तिला देताना तो मंचावर पडतो. यानंतर नोरा जय हिंद नाऱ्यासह तिरंगा फडकवण्यास सुरुवात करतात. नोराने तिरंगा फडकत असताना चुकीच्या पद्धतीने राष्ट्रध्वज फडकवला आहे, असा टीका तिच्यावर केली जात आहे. आता या चुकीमुळे लोक तिला सोशल मीडियावर ट्रोल करत आहे.
Nora Fateh I FIFA World Cup मध्ये हातात तिरंगा घेत नोरा फतेहीने केली 'ही' चूकhttps://t.co/lCLkk2N4NQ
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) December 2, 2022
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत असलेल्या या व्हिडिओवर एका युजरने आपली प्रतिक्रिया नोंदवत लिहिले आहे की,”भारतीय जयघोष करण्याची ही खूपच वाईट पद्धत आहे आणि हा राष्ट्रध्वजाचा अपमान आहे.” त्याचबरोबर अजून एक युजर कमेंट करत म्हणाला की,”तिरंग्याचा सन्मान राखता येत नाही, खराब अभिनय आणि कामगिरी सगळं काही नसतं, ज्या पद्धतीने तुम्ही तिरंगा फडकवला आहे ते खूप अपमानस्पद आहे.” तर अजून एक युजर कमेंट करत म्हणाला की,”हिला तिरंगा कसा फडकवायचा ते देखील माहित नाही. तिच्या हातात तिरंगा हिरव्या पासून केशरीपर्यंत फडकत आहे, किती लज्जास्पद बाब आहे.” यांच्याबरोबरच अनेक युजर अशाच प्रकारच्या कमेंट करत नोराला सोशल मीडियावर ट्रोल करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Skin Care | ‘या’ पद्धतीने मलाई वापरून हिवाळ्यात गुलाबासारखा फुलवा चेहरा
- Shahid Afridi | “जेव्हा आम्ही भारतात होतो”; 2011 वर्ल्ड कपची आठवण काढत शाहिद आफ्रिदी म्हणाला…
- Bhagatsingh Koshyari | राज्यपालांविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेत काय आहेत आक्षेप?, जाणून घ्या
- Bhagatsingh Koshyari | राज्यपालांना तातडीने पदावरुन हटवण्याच्या मागणी याचिकेवर मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय
- Shivsena | कोल्हापूरात लोढा यांच्या विरोधात शिवसेनेची पोलीसात तक्रार, तर पोलिसांचा तक्रार नोंदवण्यास नकार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
