Share

२० हजारांची लाच घेताना सहकारी अधिकारी चतुर्भूज

Published On: 

औरंगाबाद : येथे २० हजार रुपये लाच घेताना सहकार अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. वाल्मिक माधवराव काळे (५६) असे लाचखोर सहकार अधिकाऱ्याचे नाव आहे. सहकारी मत्स विकास संस्थेविरुध्द कारवाई न करण्यासाठी काळे याने लाच मागितली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनूसार, तक्रारदार यांच्या मत्स व्यवसाय सहकारी संस्था आहे. या संस्थेविरूध्द अनेक तक्रारी मत्स आणि दुग्ध विकास कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे या संस्थेची चौकशी सहकार अधिकारी काळे करीत होते. या अनुषंगाने तक्रारदाराने काळेंची भेट घेतली. यावेळी काळे यांनी संस्थेवरील कारवाई टाळून त्यावर प्रशासक न नेमण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वरुपात मागणी केली. तक्रारदाराची लाच देण्याची इछा नसल्याने त्यांनी काळेविरुध्द एसीबीकडे तक्रार नोंदविली.

यावर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर अधीक्षक डॉ. अनिता जमादार, उपअधीक्षक बी.व्ही.गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप राजपूत, कर्मचारी अरुण उगले, दिगंबर पाठक आणि प्रकाश घुगरे यांनी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यानंतर मंगळवारी दुपारी काळेला पकडण्यासाठी श्रीनिकेतन कॉलनी येथे सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून २० हजार रुपये लाच घेताना दबा धरून बसलेल्या पोलिसांनी काळेला रंगेहाथ पकडले. याविषयी क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!