Share

जीडीपीबद्दल बोलण्याआधी जीडीपीचा फुल फॉर्म सांगा, केसरकरांचा राणेंना टोला…

Published On: 

सिंधुदुर्ग : शिवसेनेचे जेष्ठ नेते दीपक केसरकर नाराज असल्याच्या बातम्यांनंतर अखेर केसरकर यांनी पुढे येऊन आपण नाराज नसून शिवसेना सोडणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. “कोकणात भाजपची लाट असताना मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातून फोन आला होता. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री (मनोहर पर्रिकर) यांनी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एकत्र चर्चा करायला लावली होती. पण मी भाजपमध्ये गेलो नाही” असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला आहे.

दरम्यान, केसरकर यांनी भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर देखील जोरदार प्रहार केला आहे. “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही नेते जीडीपीबद्दल बोलतात, पण त्यांनी आधी जीडीपीचा फुल फॉर्म सांगावा” असा टोला दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांना नाव न घेता लगावला. उंदीर आणि टोपीची उपमा देत दीपक केसरकर यांची राणेंवर निशाणा साधला.

“ज्याची साधी मुख्यमंत्री कार्यालयात स्टाफ म्हणून काम करण्याची पात्रता नाही, अशा माणसाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री केले. ते आज उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करतात, त्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची पात्रता आहे का?” असा प्रश्नही केसरकरांनी उपस्थित केला. अशा लोकांकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष देऊ नये, असंही केसरकर म्हणाले.

दुसरीकडे, “मी कोकणातील दहशतवादाविरोधात लढणार असून तो केवढाही मोठा माणूस असो, मी त्या विरुद्ध उभा राहणार आहे. मी भाजपमध्ये जाणार, या केवळ अफवा होत्या. माझी त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली होती. पण आपण कधीही शिवसेना सोडून जाणार नाही, हे त्यावेळीच स्पष्टपणे सांगितले होतं. आजही स्पष्ट करतो की मी कधीही शिवसेना सोडून जाणार नाही. मला त्यावेळी फक्त उद्धव ठाकरे यांनी मंत्री केलं. कोकणात भाजपची लाट असताना मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातून फोन आला. यावेळी गोव्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एकत्र चर्चा करायला लावली होती. पण मी भाजपमध्ये गेलो नाही” असा गौप्यस्फोटही दीपक केसरकर यांनी केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!