Share

‘सुरक्षित सोपं आहे’ लॉकडाऊनसाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून नागरिकांसाठी या ‘१४’ सूचना

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – देशभरात आणि राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. २१ दिवसांचा हा लॉक डाऊन १४ एप्रिल पर्यंत असेल. अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व दुकान बंद ठेवण्याचे आदेश  देण्यात आले आहेत. नागरिकांनी घर बाहेर पडू नये अश्या सूचना देण्यात आल्या आहेत.

परंतु दैनंदिन वस्तू खरेदीसाठी लोकं रस्त्यावर येताना दिसत आहेत. यातून काही ठिकाणी पोलीस आणि नागरिकांमध्ये संघर्षही पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून नागरिकांसाठी काही सूचना करण्यात आल्या आहेत. या सूचना ‘सुरक्षित सोपं आहे’ या शीर्षकाखाली देण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून खालील सूचना करण्यात आल्या आहेत –

१)  ग्राहकांनी दुकानाबाहेर योग्य अंतर राखून रांगेत उभे राहावे.

२) आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी केवळ एकाच व्यक्तीने घराबाहेर पडावे.

३) घराबाहेर पडताना मास्क वापरावा.

४) खरेदी करताना व पैसे देताना दुकानदारापासून योग्य अंतर राखा.

५) घराबाहेर असताना अनावश्यक वस्तूंना हात लावणे टाळा.

६) पोलिसांनी थांबविल्यास तुमचे घराबाहेर पडण्याचे कारण स्पष्ट करा.

७) गर्दी व संसर्ग टाळण्यासाठी दुकानदारांनी व्हाट्सअँपवर ऑडर घेऊन ग्राहकांना डिलिव्हरीची वेळ द्यावी.

८) अत्यावश्यक सेवांसाठी बाहेर असलेल्यांनी आपले ओळखपत्र सतत जवळ ठेवावे.

९) ड्रायव्हर, नोकर इ. यांना पगारी रजा द्या. कामावर येताना त्यांना संसर्ग झालं तर तो तुम्हालाही होऊ शकतो.

१०) डिलिव्हरीसाठी येणाऱ्या व्यक्तीपासून सुरक्षित अंतर राखा.

११) घरी आल्यावर प्रथम आपले हात साबण व पाण्याने धुवा.

१२) खरेदीसाठी एक वेगळी पिशवी राखून ठेवा.

१३) संसर्गाची शक्यता कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक टाळा.

१४) संसर्गाची चिन्हे दिसल्यास प्रथम स्वतःला सर्वांपासून वेगळे करा आणि हेल्पलाईनवर फोन करा.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!