Share

संभ्रम टाळण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने दिली ‘लॉक-डाऊन’ संदर्भातील निर्णयांची माहिती

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – राज्यात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन करण्यात आलं असून नागरिकांमध्ये कोणत्या सुविधा सुरु असतील आणि कोणत्या बंद यावरून संभ्रम बघायला मिळत आहे. आता हाच संभ्रम दूर करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने एक ग्राफिक्स प्रसिद्ध केलं असून यात लॉक डाऊन बद्दल तपशीलवार माहिती दिलेली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्वीटरवर याबाबत माहिती दिलेली आहे. यात म्हटलंय राज्य सरकारकडून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी खालील उपाय योजना करण्यात आल्या आहेत. याची माहिती तुम्ही आपले मित्र नातेवाईक यांना पाठवा ज्यामुळे संभ्रम दूर होईल.

महाराष्ट्र सरकारने ३१ मार्चपर्यंत लॉक डाऊन केलेला आहे यानुसार खालील निर्णय घेण्यात आले आहेत:-

१) राज्याच्या सर्व सीमा अत्यावश्यक सेवा सोडून इतर कामासाठी बंद करण्यात येत आहेत.

२) राज्यातील सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. यात महाराष्ट्र परिवहन मंडळ आणि मेट्रोचा समावेश आहे. टॅक्सीमध्ये चालक सोडून दोन टर रिक्षामध्ये चालकसोडून एक प्रवासी फक्त अत्यावश्यक सेवा आणि निर्देशित कामांसाठी वापरता येतील. खाजगी वाहनांचा वापर फक्त अत्यावश्यक सेवा, दवाखाना आणि निर्देशित कामांसाठी वापरता येतील. या वेळी चालकाव्यतीरिक्त फक्त एका व्यक्तीला परवानगी असेल.

३) राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी प्रवासी सुविधा पुरवणाऱ्या व्यवस्था बंद राहतील. या बंदीत खाजगी वाहनांनी प्रवासाचाही समावेश असेल.

४) होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींनी दिलेल्या सूचना पाळाव्यात अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

५) नागरिकांनी घराबाहेर पडू नये . गरज पडल्यास फक्त अत्यावश्यक गोष्टींसाठी बाहेर पडावे. तसेच सोशल डीस्टनसिंग पाळावे आणि मुद्दा क्रमांक २ च्या सूचना पाळाव्यात.

६) ५ पेक्षा जास्त व्यक्तीने एकत्र जमू नये.

७) सर्व दुकाने आणि व्यापारी केंद्रे बंद राहतील. या बंदीतून औषध उत्पादन करण्याऱ्या केंद्रांना वगळण्यात आलं आहे. तसेच तांदूळ आणि डाळ मिल , अन्न उत्पादने विक्री दुकाने, डेअरी, पशुखाद्या दुकाने इत्यादींना बंदीतून वगळण्यात येत आहे.

८) सरकारी विभागांनी कमीत कमी कर्मचाऱ्यांसह काम करावे. तसेच सोशल डीस्टनसिंग म्हणून व्यक्ती आणि काऊँटरमध्ये किमान ३ फूट अंतर ठेऊन काम करावे. तसेच संपूर्ण कार्यालय निर्जंतुकीकरण करून घ्यावे तसेच सॅनिटायझरचा वापर करावा.आणि हात धुण्याची व्यवस्था करणे.

९) सर्व धार्मिक स्थळांवर कुठलीही प्रार्थना सभा घेण्यावर बंदी असेल. यासाठी सूचना देण्यात याव्या.

१०) लॉक डाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी काळजी घेण्यात यावी.

११) सर्व तातडीच्या नाहीत अश्या शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्यात जेणेकरून शासकीय आणि खाजगी हॉस्पिटलमधील सुविधांचा उपयोग कोरोना बाधित रुग्णांसाठी वापरता येतील.

१२) कोणतीही व्यक्ती, संस्था यांनी या नियमांचे आणि आदेशाचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर साथीचा रोग कायदा १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!