टीम महाराष्ट्र देशा – राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉक डाऊन जाहीर करण्यात आलं आहे. नागरिकांनी फक्त जीवनावश्यक आणि अत्यावश्यक परिस्थितीतच घराबाहेर पडावे असं सरकार आणि प्रशासनाकडून स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्यातील स्थितीची आणि औषधे, धन्य आणि एकूण तयारीचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्य सचिव, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तसेच इतर संबंधित विभागांच्या आयुक्तांची बैठक घेतली.
या बैठकीत सोशल डीस्टन्सिंगच तत्व पळाल्याच दिसत आहेच तसेच ही बैठक खुल्या बागेतील लॉनवर घेण्यात आली. तसेच पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य उद्धव ठाकरे यांनीही या बैठकीला हजेरी लावल्याचं फोटोत दिसत आहे.
कोरोना उपयाययोजना संदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वर्षा येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बंदिस्त वातावरण टाळून आणि अधिकाऱ्यांच्या बैठक व्यवस्थेत योग्य अंतर ठेवून ही बैठक घेण्यात आली. pic.twitter.com/NSAPL8tQN1
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 26, 2020
CM Uddhav Balasaheb Thackeray took a review meeting with the Chief Secretary, Secretaries of relevant departments & @mybmc Municipal Commissioner to take stock of the situation.
Fully adhering to social distancing, temperature check, sanitising & open air. pic.twitter.com/RaIbGu2bzx
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 26, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

