टीम महाराष्ट्र देशा – देशभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाला अटकाव घालण्याचा एकमात्र मार्ग लॉक डाऊन असल्याने देशभरात लॉक डाऊन घोषित करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल पर्यंतच लॉक डाऊन आपल्या सकाळच्या संबोधनात ३ मे पर्यंत वाढवल्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दोनच दिवसापूर्वी राज्यातील लॉक डाऊन ३० एप्रिल पर्यंत वाढवण्यात आला आहे अशी घोषणा केली होती. परंतु आता पंतप्रधानांनी ३ मे पर्यंत घोषणा केल्याने राज्यातही लॉक डाऊन वाढण्याची शक्यता आहे.
आता मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे राज्यातील जनतेला रात्री ८ वाजता संबोधित करणार आहे. या संवादात राज्यातील काही भागात लॉक डाऊन शिथिल होण्याची शक्यता आहे. तसेच शेती, विद्यापीठ परीक्षा इत्यादिन बाबत नवीन नियमावलीचीही घोषणा केली जाऊ शकते.
CM Uddhav Balasaheb Thackeray will address the State at 8:00 pm on 14th April, 2020#WarAgainstVirus
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 14, 2020
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

