टीम महाराष्ट्र देशा – देशात आणि राज्यात कोरोनाच्या कसेस दिवसागणिक वाढत आहेत. प्रशासन, सरकार, मुख्यमंत्री , पंतप्रधान सगळ्यांकडून नागरिकांना घराबाहेर पडू नका . गर्दी करू नका अस वारंवार आवाहन केलं जात आहे परंतु रस्त्यावरची गर्दी काही कमी होताना दिसत नाही.
आता शेवटी नाईलाज म्हणून सरकारने सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद केली आहे आणि संचार बंदी लागू केली आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत.आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही नागरिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश पाळावे असं आवाहन केलं आहे.
त्या म्हणाल्या,’ राज्य सरकार आदेश देत आहे त्याचे पालन करणे गरजेचे आहे कारण ते आदेश आपल्या रक्षणासाठी आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. कोरोना राज्यातून घालवायचा असेल तर सरकार जे सांगत आहे त्याचे पालन करा, मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे 31 मार्चपर्यंत घराबाहेर पडू नका, आज संचारबंदी देखील राज्यात लागू करण्याची घोषणा झाली आहे.
त्यामुळे कोरोनाला राज्यातून हद्दपार करण्यासाठी आता बिग बॉस जसे सांगतील तसेच आपल्याला ऐकावे लागेल आणि त्याची अंमलबजावणी करावी लागेल असेही भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्तीताई देसाई म्हणाल्या आहेत.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

